Posts

योग्य वेळी केलेल्या सत्कारामुळे शिक्षकांना स्फूर्ती मिळते - आ.समाधान आवताडे

Image
पंढरपूर –'समाजात काम करताना चांगल्या माणसांच्या पाठीवर नेहमी कौतुकाची थाप पडावी या दृष्टीने डॉ.बी.पी रोंगे सरांनी  उत्तमरीत्या या सोहळ्याचे आयोजन केले आहे. सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना त्यामुळे स्फूर्ती मिळते. डॉ.रोंगे सरांनी गोपाळपूरच्या माळरानावर शून्यातून विश्व उभे केले आहे, हे सारा महाराष्ट्र जाणत आहे. स्वेरीने वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष संशोधने यशस्वीपणे केली आहेत, करत आहेत. एकूणच त्यांच्या मागे डॉ. रोंगे सरांचा बारीक अभ्यास दिसून येतो.' असे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले.         गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने पंढरपूर व माळशिरस तालुक्याकरिता स्वेरीत आयोजिलेल्या ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्या’ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानवरून आमदार समाधानदादा आवताडे बोलत होते. दीपप्रज्वलनानंतर श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक, कॉलेज ऑफ इंजिन...

कर्मयोगी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

Image
 काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने केवळ एक व्यक्ती राहत नाहीत, तर समाजासाठी प्रेरणास्थान बनतात. त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि संस्कारांचा ठसा अनेक पिढ्यांच्या मनावर उमटतो. अशाच कर्मयोगी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक). सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य हे त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे प्रतीक आहे. सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होत, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्यात पदापेक्षा सेवा, प्रसिद्धीपेक्षा समाजहित आणि स्वार्थापेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व होते. आज त्यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करताना, त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांचे विचार, त्यांची माणुसकी आणि समाजासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहील. कर्मयोगी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! भावपूर्ण श्रद्धांजली!  अभिवादक - आ.श्री.समाधान पार्वती महादेव आ...

कर्मयोगी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

Image
  काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने केवळ एक व्यक्ती राहत नाहीत, तर समाजासाठी प्रेरणास्थान बनतात. त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि संस्कारांचा ठसा अनेक पिढ्यांच्या मनावर उमटतो. अशाच कर्मयोगी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक). सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य हे त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे प्रतीक आहे. सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होत, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्यात पदापेक्षा सेवा, प्रसिद्धीपेक्षा समाजहित आणि स्वार्थापेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व होते. आज त्यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करताना, त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांचे विचार, त्यांची माणुसकी आणि समाजासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहील. कर्मयोगी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! भावपूर्ण श्रद्धांजली!

स्वेरीची एआयसीटीईच्या 'परम शवक' या उपक्रमासाठी निवड!

Image
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)ची प्रतिष्ठित अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई- ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) 'परम शवक' या उपक्रमासाठी निवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 'परम शवक' सुपरकॉम्प्युटर मिळवणारी स्वेरी ही एकमेव संस्था ठरली आहे.          परम शवक ही सी-डॅकने विकसित केलेली अत्याधुनिक सुपरकॉम्प्युटिंग प्रणाली असून ती कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा, वैज्ञानिक संगणन आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानातील शिक्षण व संशोधनासाठी विशेष उपयुक्त आहे. या सुविधेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांना अत्याधुनिक संगणकीय क्षमता उपलब्ध होणार असून कृत्रिम बुद्धिमत्तेवरील प्रकल्प, मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण, संशोधन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकासासाठी मोठी मदत होणार आहे तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळून उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास चालना मिळणार आहे. ही निवड ...

स्वेरीच्या १६ विद्यार्थ्यांची ‘ईगीअर्झ’ या कंपनीत निवड!

Image
      पंढरपूरः ‘ईगीअर्झ’ या भारतीय बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील १६ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.           ‘ईगीअर्झ’ या भारतीय बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील अथर्व मिलिंद बोचरे,अवधूत अशोक भोसले, दीक्षा चंद्रकांत शिंदे, मकरंद परमेश्वर कचरे, निकिता वैजिनाथ सूर्यवंशी, प्रशांत संजय सुरवसे, प्रथम शशिकांत ताठे, प्रथमेश प्रकाश नवले, प्रतिक दीपक येडवे, रोहित दत्तात्रय भुई, संदेश दत्तात्रय बिचुकले, सानिका राजेंद्र गव्हाणे, सुयश ज्ञानेश्वर इंगोले, स्वप्नील बाजीराव बोंगे, वसीम ईलाही मुलाणी व विजयकुमार प्रशांत द...

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग व एम.बी.ए. प्रवेशासाठी कॅप राऊंड-२ चे ऑप्शन्स फॉर्म भरण्याची प्रक्रिया दि.७ ऑगस्ट पासून सुरू!

Image
पंढरपूरः 'शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष इंजिनिअरिंग व एम.बी.ए प्रवेशाची द्वितीय फेरी (सेकंड कॅप राऊंड)चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ पासून ते सोमवार, दि. ९ ऑगस्ट  २०२६ पर्यंत म्हणजेच एकूण तीन दिवस चालणार आहे. या कालावधीत स्वेरी अभियांत्रिकीच्या स्क्रूटीनी सेंटर (एस.सी.क्रमांक ६२२०) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय करण्यात आली आहे. ज्यांनी प्रथम वर्ष इंजिनिअरिंग किंवा प्रथम वर्ष एम.बी.ए प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन केले आहे तसेच प्रथम प्रवेश फेरीत बेटरमेंट केले आहे अथवा प्रथम प्रवेश फेरीत ज्यांना सीट अलॉट झालेली नाही अशा विद्यार्थ्यांना या प्रवेश फेरीचा लाभ घेता येईल.’ अशी माहीती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.         सन २०२६-२७ मध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंग किंवा प्रथम वर्ष एम.बी.ए प्रवेशासाठीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे,भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी व निश्चिती करणे आदी  प्रक्रिया पूर्वीच पूर्ण झालेल्या आह...

स्वेरीमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी!

Image
पंढरपूर - गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्वेरीचे संस्थापक व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.         याप्रसंगी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी हे उपस्थित होते. सुरवातीला डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाच्या विभागप्रमुख डॉ. नीता तळवलकर यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, शाहिरी, पोवाडे, लावणी व ग्रामीण साहित्य यावर सविस्तर माहिती दिली. मराठी साहित्य क्षेत्रात अण्णाभाऊंच्या लेखन प्रतिभेने ग्रामीण भागातील साहित्याचे दालन अधिक समृद्ध आणि देखणे केले कारण लोकशाहीर अण्णाभाऊंच्या साहित्यात आणि शाहिरीमधून कधीही नकारात्मकता दिसत नाही. बालपणी प्रतिकूल परिस्थितीमुळे आयुष्यातील केवळ एकच दिवस शाळा शिकणाऱ्या अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून स...

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाचा कॅप राऊंड-३ सोमवारपासून सुरु..!

Image
पंढरपूर!  'शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाची तिसरी फेरी (थर्ड कॅप राऊंड) सोमवार, दि. २७ जुलै २०२६ पासून सुरु होणार असून ती प्रक्रिया मंगळवार, दि.२८ जुलै २०२६ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत स्वेरी डिप्लोमाच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. क्रमांक ६४३७) मध्ये कॅप राउंड साठी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. या प्रवेशाची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरूवार दि.३० जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.' अशी माहीती स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक) चे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी दिली.          सन २०२६-२७ च्या पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज निश्चित करणे आदी प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर आता सोमवार, दि. २७ जुलै २०२६ पासून तृतीय प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे सुरु होणार असून ती प्रक्रिया मंगळवार, दि.२८ जुलै २०२६ सायंकाळी ५:०० वाजेप...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा समारोप!

Image
पंढरपूर! आषाढी एकादशी निमित्  ग्रामविकास आणि पंचायतराज विभागातर्फे आयोजित ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रसारख्या पुरोगामी आणि भक्ती मार्गाची समृद्ध परंपरा असलेल्या या राज्यात वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने सन २०१६ पासून सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदा निर्मल वारी उपक्रम सुरु केला आणि सन २०१७ पासून राज्याच्या अर्थसंकल्पात आणून जिल्हा प्रशासन आणि सहयोग संस्था माध्यमातून वारी निर्मल वारी करण्याच्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात शौचालय, स्नानगृह, स्वच्छता आदी व्यवस्था सुविधा सुरु केल्या. वारकऱ्यामध्ये विठू माऊली असल्याने त्याची सेवा करणे हे आपले परम कर्तव्य मानून या भावनेतून या व्यवस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज य...

आषाढी यात्रा 2026 निमित्त पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना व भाविकांना पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने नम्र आवाहन..!

Image
आषाढी यात्रा 2026 निमित्त पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना व भाविकांना पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने नम्र आवाहन! पंढरपूर भुवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक, भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे. शहराचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वाचे आद्य कर्तव्य आहे. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखणे करीता खालील सुचनांचे सर्वांनी पालन करुन पंढरपूर नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे ही नम्र विनंती. 1) राहण्याची व्यवस्था :- यात्रेकरु, दिंडीकरी,फडकरी, भाविकभक्त इ. यांची राहणेची सोय भक्ती सागर 65 एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे. कोणत्याही धोकादायक इमारती मध्ये राहु नये. 2) उघड्यावरील अन्न टाळा :- आपले आरोग्य बिघडू नये म्हणून उघड्यावरील व माश्या बसलेले अन्नपदार्थ, शिळे अन्न आणि नासकी फळे, कापलेली फळे खाणे टाळावे. 3) शुद्ध पाणी :- नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या शुद्ध व पिण्याच्या पाण्याचाच वापर करावा नदीचे व बोअरचे पाणी पिऊ नये. 4) घनकचरा व्यवस्थापन :- आपल्या मठ/संस्था, वास्तव करणाऱ्या ठिकाणी इ. मध्ये निर्माण होणारा कचरा/पत्रावळी द्रोण, शिळे खरकटे अन्न इ. ओला, सुका असा वेग...

गोपाळपूर येथे स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान उत्साहात!

Image
पंढरपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार तसेच स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) विभागामार्फत दि. २२ जुलै २०२६ रोजी गोपाळपूर येथे 'स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी' या स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.      कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर गोपाळपूर येथून रीद्धी-सिद्धी गणेश मंदिरापर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये सुमारे १.५ ते २ टन कचरा संकलित करण्यात आला असून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या कार्यक्रमास गोपाळपूरचे ज्येष्ठ नागरिक दिलीप गुरव, पांडुरंग देवमारे, प्रशासक ग्रामपंचायत साईनाथ अडगटाळे, महसूल अधिकारी, विलास मस्के, उदय पवार, अरुण बनसोडे, राजेंद्र बनसोडे, सचिन आसबे, अतुल गुरव, लक्ष्मण लेंगरे, विक्रम आसबे, राहुल माने, गोपाळ ...

पंढरपूर! आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी 24 ते 26 जुलै दरम्यान महाआरोग्य शिबिर!

Image
पंढरपूर! दिनांक 23 आषाढीवारी 2026 च्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 26 जुलै 2026 या कालावधीत पंढरपूर येथील तीनरस्ता परिसरात महाआरोग्य  शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  या महाआरोग्य शिबिरात वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी,उपचार,औषधोपचार,आरोग्यसल्ला तसेच विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.तसेच गंभीर रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्स सेवा सज्ज ठेवण्यात आली असून तातडीच्या उपचारांसाठी विशेष वैद्यकीय पदके ही कार्यरत असणार आहेत.  याशिवाय आरोग्य संपन्नवारी मोबाईल ॲपद्वारे जवळच्या आरोग्य सुविधांची माहिती रुग्णवाहिका सेवा आरोग्य केंद्रांचे तपशील आणि आपत्कालीन संपर्क उपलब्ध होणार आहेत. शिबिरात आरोग्य शिक्षण प्रतिबंधात्मक उपाययोजना चरणसेवा तसेच आपत्कालीन वैद्यकीय मदत यांचाही समावेश आहे. वारीदरम्यान प्रत्येक वारकऱ्याला वेळेत आणि गुणवत्ता पूर्ण आरोग्यसेवा मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून वारकरी भाविकांनी या मोफत महाआरोग्य...

स्वेरीच्या क्षितीजा उराडे यांची ‘टेक्नीमोंट प्रा.लि.’ या कंपनीत निवड..वार्षिक पॅकेज रु.७ लाखांचे

Image
     ‘टेक्नीमोंट प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात अंतिम वर्षात शिक्षण असलेल्या क्षितीजा हिरामण उराडे यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून  यंदा देखील विक्रमी प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांचा स्वेरीकडे अधिक कल दिसत आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे  प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.             ‘टेक्नीमोंट प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागामधील अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या क्षितीजा हिरामण उराडे यांची निवड केली. उराडे यांना वार्षिक रु. ७ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमधून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्...

स्वेरीच्या निखील जाधव यांची ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रा.लि.’ या कंपनीत निवड.!

Image
 नोकरीच्या तब्बल ४७३ पेक्षा जास्त संधी  पंढरपूरः ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’  या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे निखील नवनाथ जाधव यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून यंदा देखील चांगल्या प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांचा स्वेरीकडे अधिक कल दिसत आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे  प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागामधील अंतिम वर्षात शिक्षण घेणारे निखील नवनाथ जाधव यांची निवड केली असून त्यांना वार्षिक रु. ४ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमधून प्लेसमेंटच्या माध्...

स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची ‘अॅक्वा चिल सिस्टम्स इंडिया प्रा.लि.’ या नामांकित कंपनीत निवड..!

Image
 ‘अॅक्वा चिल सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या निवड प्रक्रियेतून गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.      ‘अॅक्वा चिल सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील अवधूत अशोक भोसले व रोहन माणिक रोकडे या दोन विद्यार्थ्यांची निवड केली. ‘अॅक्वा चिल सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी २८ वर्षे जुनी असून १९९७ साली स्थापन झाली आहे. ही कंपनी प्रामुख्याने एचव्हीएसी या क्षेत्रात कार्यरत आहे. लवकरच ही कंपनी एक हजार कोटी टर्न ओव्हरचे ध्येय गाठणार आहे. एचव्हीएसी हे एक विशेष कार्यक्षेत्र आहे. त्याचा उपयोग फार्मसी, दवाखाने, मेकॅनिकल आणि इतर बऱ्याच विभागात होतो. यामुळे विद्यार्थ्यांना अशा विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आह...

स्वेरी अभियांत्रिकीत जपानी भाषा कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Image
पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने डिग्री इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी ‘जपानी भाषा आणि करिअरच्या संधी’ या विषयावर एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना जागतिक रोजगाराच्या संधी, जपानी भाषा, संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय करिअरविषयी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.           कार्यशाळेस ‘मोसाईक प्रायव्हेट लिमिटेड’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हिरो इशिदा हे प्रमुख अतिथी व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच इंडो-जपान कौन्सिलचे श्रीकांत गुंजाळ यांनी विशेष वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वेरी या संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली या क...

स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जबाबदार वापराबद्दल प्रभावी पथनाट्य..!

Image
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस विभाग तसेच निर्भया पथक, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘मोबाईल व सोशल मीडियाचा योग्य वापर’ या विषयावर जनजागृतीपर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करण्यात आले. सध्याचे युवक मोबाईलच्या वापराचा अतिरेक करत आहेत. त्यामुळे त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. अभ्यास करण्याच्या वयात विद्यार्थी व तरुण मोबाईलचा अतिवापर करत असल्याचे दिसून येते. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून समाज प्रबोधन करणे गरजेचे असते. त्यासाठी स्वेरीने एक उत्तम पथनाट्याची रचना करून मनोरंजनातून जनजागृती केल्याचे दिसून येते.            स्वेरी संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपत...

स्वेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२वी जयंती साजरी..!

Image
पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५२ वी जयंती साजरी करण्यात आली.          कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. नीता तळवलकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, सामाजिक न्याय, शिक्षणाचा प्रसार, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य तसेच समाजसुधारणेसाठी त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. हा कार्यक्रम स्वेरीचे संस्थापक प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार आणि विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, अधिष्ठाता, विविध विभागांचे विभागप्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे,  प्राध्यापक वर्ग, शिक्षके...

स्वेरीमध्ये बारावा ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा..!

Image
       पंढरपूर- ‘धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे. यामुळे आपण भविष्यात अनेक व्याधीपासून दूर राहू शकतो. शरीराबरोबरच मन निरोगी राहण्यासाठी योगा सातत्याने करणे आवश्यक आहे. योगामुळे आपले मन स्थिर व बुद्धी चंचल रहाते आणि हाती घेतलेल्या कार्यात उत्साह वाढतो. एकूणच आरोग्यदायी जीवनासाठी योगा आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन योग व मार्शल आर्टचे प्रशिक्षक श्री. राजेंद्र अनवते यांनी केले.          राष्ट्रीय सेवा योजना, उन्नत भारत अभियान व स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटच्या भव्य क्रीडांगणावर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदविका), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) व स्वेरी लॉ कॉलेज मध्ये बारावा ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग व मार्शल आर्टचे प्रशिक्षक राजेंद्र अनवते हे आरोग्यासंबंधी बहुमोल मार्गदर्शन करत होते. समीर बॉम्बे चे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.मिलिंद जोशी म्ह...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांचा गौरव; मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे पाटील यांच्याकडून प्रेरणादायी उपक्रम!

Image
        महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कै. शंकरराव मोहिते पाटील विद्यालय, बैरागवाडी,ढेकळेवाडी (ता. मोहोळ) येथे दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे पाटील यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. तसेच विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून कठोर परिश्रमाच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन केले. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, पर्यावरण आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारे महादेव ...