Posts

Showing posts from June, 2026

स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जबाबदार वापराबद्दल प्रभावी पथनाट्य..!

Image
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस विभाग तसेच निर्भया पथक, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘मोबाईल व सोशल मीडियाचा योग्य वापर’ या विषयावर जनजागृतीपर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करण्यात आले. सध्याचे युवक मोबाईलच्या वापराचा अतिरेक करत आहेत. त्यामुळे त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. अभ्यास करण्याच्या वयात विद्यार्थी व तरुण मोबाईलचा अतिवापर करत असल्याचे दिसून येते. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून समाज प्रबोधन करणे गरजेचे असते. त्यासाठी स्वेरीने एक उत्तम पथनाट्याची रचना करून मनोरंजनातून जनजागृती केल्याचे दिसून येते.            स्वेरी संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपत...

स्वेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२वी जयंती साजरी..!

Image
पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५२ वी जयंती साजरी करण्यात आली.          कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. नीता तळवलकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, सामाजिक न्याय, शिक्षणाचा प्रसार, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य तसेच समाजसुधारणेसाठी त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. हा कार्यक्रम स्वेरीचे संस्थापक प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार आणि विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, अधिष्ठाता, विविध विभागांचे विभागप्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे,  प्राध्यापक वर्ग, शिक्षके...

स्वेरीमध्ये बारावा ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा..!

Image
       पंढरपूर- ‘धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे. यामुळे आपण भविष्यात अनेक व्याधीपासून दूर राहू शकतो. शरीराबरोबरच मन निरोगी राहण्यासाठी योगा सातत्याने करणे आवश्यक आहे. योगामुळे आपले मन स्थिर व बुद्धी चंचल रहाते आणि हाती घेतलेल्या कार्यात उत्साह वाढतो. एकूणच आरोग्यदायी जीवनासाठी योगा आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन योग व मार्शल आर्टचे प्रशिक्षक श्री. राजेंद्र अनवते यांनी केले.          राष्ट्रीय सेवा योजना, उन्नत भारत अभियान व स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटच्या भव्य क्रीडांगणावर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदविका), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) व स्वेरी लॉ कॉलेज मध्ये बारावा ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग व मार्शल आर्टचे प्रशिक्षक राजेंद्र अनवते हे आरोग्यासंबंधी बहुमोल मार्गदर्शन करत होते. समीर बॉम्बे चे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.मिलिंद जोशी म्ह...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांचा गौरव; मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे पाटील यांच्याकडून प्रेरणादायी उपक्रम!

Image
        महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कै. शंकरराव मोहिते पाटील विद्यालय, बैरागवाडी,ढेकळेवाडी (ता. मोहोळ) येथे दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे पाटील यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. तसेच विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून कठोर परिश्रमाच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन केले. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, पर्यावरण आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारे महादेव ...

स्वेरी फार्मसीच्या सहा विद्यार्थ्यांचे जी-पॅट परिक्षेत यश!

Image
 बातमी                                  गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित औषधनिर्माणशास्त्र (बी.फार्मसी) महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना जी-पॅट (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टीटयूड टेस्ट) २०२६ या राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेत उज्ज्वल यश मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.         स्वेरी संचलित औषधनिर्माणशास्त्र तथा बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे भोसले काजल रणजीत गुण २३१, (ऑल इंडिया रँक ११५२), तांबोळी अलिशा गौस गुण २२१ (ऑल इंडिया रँक १५८७), घोडके मोनाली समाधान गुण १९८ (ऑल इंडिया रँक ३१६४), पृथ्वीराज साहेबराव भुसे गुण १९२ (ऑल इंडिया रँक ३७०७) हिल्लाळ श्रेया प्रमोद गुण १८३, ( ऑल इंडिया रँक ४६३५), काळे संदीप दत्तात्रय गुण १८१,(ऑल इंडिया रँक ४८६९) अशा एकूण  सहा विद्यार्थ्यांनी एम. फार्मसीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील अतिशय अवघड परंतु आवश्यक असणाऱ्या जी-पॅट या परिक्षेत उज्वल यश संपादन केले आहे...

स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाची आणखी एक ऐतिहासिक भरारी..!

Image
पंढरपूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन शैक्षणिक व प्रशासकीय लेखापरीक्षणात स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) ला ६०० पैकी तब्बल ५८८ गुण (९८%) देत सर्वोच्च 'ए प्लस प्लस' श्रेणी प्रदान केली आहे.  महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ अंतर्गत विद्यापीठाच्या समितीने महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, संशोधन व नवोपक्रम, विद्यार्थी विकास, उद्योग-संस्था सहकार्य, प्रशासन, वित्तीय व्यवस्थापन, सामाजिक बांधिलकी तसेच पायाभूत सुविधांचे सखोल मूल्यमापन करून हा मानाचा दर्जा प्रदान केला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यापीठामार्फत महाविद्यालयास 'ट्रिपल ए' चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून ही मान्यता नोव्हेंबर २०२८ पर्यंत वैध राहणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाभिमुख वातावरण, उद्योगाभिमुख उपक्रम, अत्याधुनिक सुविधा आणि प्रभावी प्रशासन यांच्या बळावर स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्टतेची विद्यापीठ स्तरावर ठळक नोंद करून दिली आहे....

स्वेरीमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

Image
पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त वृक्षारोपण हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. यामध्ये विविध प्रकारच्या रोपट्यांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.          शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या  वतीने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी स्वेरी कॅम्पसमध्ये रोपट्यांची लागवड  करून पर्यावरण संरक्षणाची सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इस्कॉन, कोल्हापूर येथील पुरुषोत्तम आनंददास महाराज तसेच केरले (जि. कोल्हापूर)मधील हनुमान हायस्कूलचे रणदिवे व आदी उपस्थित होते. त्याचबरोबर स्वेरी संचलित कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.सतीश मांडवे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एन. ए. तळवलकर, कॉम्प्यूटर स...