Posts

Showing posts from December, 2025

रयत शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांच्या पदमान्यता व वेतनाचा प्रश्न मार्गी

Image
 सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधील एकूण २७ मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या पदोन्नतीनंतर तब्बल आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेला पदमान्यता व वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. हा प्रश्न श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक तसेच स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या प्रभावी प्रयत्नांमुळे सुटला आहे. मागील वर्षी रयत शिक्षण संस्थेतील २७ शिक्षकांची विविध पदांवर पदोन्नती झाली होती. मात्र, पदमान्यतेसंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया रखडल्याने काही शिक्षकांचे वेतन थांबले होते, तर काही शिक्षकांना पदोन्नतीच्या पूर्वी असलेल्या पदानुसार कमी वेतन दिले जात होते. परिणामी, शिक्षकांमध्ये अनिश्चितता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. रोंगे यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी सचिनजी जगताप यांची भेट घेऊन प्रकरणाची सविस्तर मांडणी केली. तांत्रिक अडचणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रशासकीय प्रक्रिया यांवर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर अखेर या प्रलंबित प्रश्नाचा मा...

37 लाखांची फसवणूक व खंडणी प्रकरणात महिला डॉक्टरला जामिन; बचाव पक्षाचा प्रभावी युक्तिवाद न्यायालयाकडून ग्राह्य*

Image
  पुणे : 37 लाखांची फसवणूक, खंडणीची मागणी, अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी तसेच घरफोडी अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आलेल्या महिला डॉक्टरला पुणे न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिताच्या कलम 318(2), 316(2), 308(2), 305(a), 3(5), 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान * बचाव पक्षातर्फे अॅड प्रविण जगताप ॲड. शंतनू माने अॅड रविंद्र आरो  अॅड श्रीकांत ओव्हाळ आणि ॲड. निकिता बनसोडे * यांनी प्रकरणातील तथ्ये, आरोपांतील विसंगती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीच्या बाजूने भक्कम व प्रभावी युक्तिवाद मांडला. दुसरीकडे, * फिर्यादीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे * यांनी कठोर भूमिका घेत गंभीर आरोपांचे गांभीर्य अधोरेखित करणारा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने बचाव पक्षाने मांडलेले मुद्दे ग्राह्य धरत महिला डॉक्टरला जामिन मंजूर करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाचा हा आदेश प्रकरणाच्या पुढील कार्यवाहीस महत्त्वपूर्ण दिशा देणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

पुणे विभागीय शिक्षक मतदार नोंदणीमध्ये डॉ.बी.पी.रोंगे सर अग्रेसर..!

Image
 पुणे विभागातील शिक्षक मतदार नोंदणी मोहिमेला भरघोस प्रतिसाद मिळत असून पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या  जिल्ह्यात सुरु असलेल्या शिक्षक  मतदार नोंदणी उपक्रमात श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे सरांची प्रभावी आणि पुढाकार घेणारी नेतृत्व भूमिका विशेषत्वाने अधोरेखित होत आहे. शिक्षण आणि शिक्षकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले डॉ. रोंगे यांनी या मोहिमेच्या प्रारंभापासूनच मतदार नोंदणी ही केवळ प्रक्रिया नसून शिक्षकांच्या लोकशाही सहभागाचा महत्त्वपूर्ण भाग आहे, हे स्पष्ट केले आहे.            मतदार नोंदणीची गती वाढवण्यासाठी डॉ. रोंगे यांनी पुणे विभागातील शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शिक्षण संस्था, डी. एड./बी. एड. महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये अशा विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षकांशी तसेच निवृत्त शिक्षकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी नोंदणीची आवश्यकता, नियम, आवश्यक कागदपत्रे आणि वेळापत्रक य...