Posts

Showing posts from November, 2025

स्वेरी महाविद्यालयाचा इंटी विद्यापीठ, मलेशिया येथील अभ्यास दौरा संपन्न..!

Image
 पंढरपूर– गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील विद्यार्थी व प्राध्यापक प्रतिनिधी मंडळ यांचा मलेशियातील इंटी (आयएनटीआय) विद्यापीठ येथे तीन आठवड्यांचा शैक्षणिक अध्ययन दौरा नुकताच पार पडला. हा अभ्यास दौरा संस्थेच्या जागतिक संबंधांना अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.          इंटी विद्यापीठ हे १९८६ मध्ये स्थापन झाले असून मलेशियातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठाने क्यु. एस. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये ५०९ वा क्रमांक मिळविला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिकण्याची, प्रगत तंत्रज्ञानाची आणि करिअरच्या संधींची थेट ओळख व्हावी यासाठी संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याची ठळक व...

स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘राष्ट्रीय फार्मासिस्ट दिवस २०२५’ संपन्न..!

Image
 स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘राष्ट्रीय फार्मासिस्ट दिवस २०२५’ संपन्न झाली..   ‘विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील विविध शासकीय परीक्षांची तयारी कशी करावी, येणाऱ्या अडचणी व त्यांचे नियोजन, याबद्दल महत्वपूर्ण माहिती देवून स्वेरीच्या आदर युक्त शिस्तीचे कौतुक केले.  राष्ट्रीय फार्मसी सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांच्या विजेत्या आणि उपविजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख प्रा. सुप्रज्ञा गायकवाड यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी गायत्री कापसे, लक्ष्मी दबडे, सानिका बाबर, स्वप्नाली घाडगे व दीक्षा झांबरे यांनी केले तर सुयश भोसले यांनी आभार मानले.

कार्तिकी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी... स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम..!

Image
दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी वारीच्या निमित्ताने श्री.विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीसाठी आतूर झालेल्या आणि दर्शन रांगेत तासन तास उभ्या असलेल्या वारकऱ्यांची तहान स्वेरीचे विद्यार्थी शुद्ध पाणी देवून भागवीत आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.   स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, विभागप्रमुख आणि प्राध्यापक वर्ग हे पाणी वाटप करत आहेत. स्वेरीचे सचिव डॉ.सुरज रोंगे यांच्या हस्ते रिद्धी सिद्धी मंदिराजवळ पाणी वाटपाच्या या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या पाणी वाटपाच्या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच संस्थेतील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पाणी वाटप करत आहेत. स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती,  स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, प्रा. महुवा बिस्वास, इतर सहकारी, प्राध्यापक व विद्यार्थी या उपक्रमासाठी विशेष कष्ट घेत आहेत. राज...