Posts

Showing posts from March, 2025

संपूर्ण सांगोला तालुक्यात सामाजिक उपक्रम राबवून कार्यतपस्वी स्व.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Image
 सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते आणि कार्यतपस्वी आमदार स्व. काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सांगोला शहर आणि संपूर्ण तालुक्यात शुक्रवार दि २८ मार्च रोजी विविध कार्यक्रम पार पडले. आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करताना ५२ वर्षानंतरही सामाजिक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम सांगोला तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी केले आहे. दरवर्षी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीनमित्त संपूर्ण सांगोला शहर आणि तालुक्यात विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे यंदाही शुक्रवारी दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महूद बु. येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महुद येथील विद्यार्थ्यांना महूद ग्रामस्थांच्या वतीने शालेय साहित्यांचे व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते जयवंत नागणे गुरुजी, कैलास खबाले, धनंजय पाटील, विठ्ठल बागल ,अंगद जाधव, यशवंत खबाले ,अभिषेक कांबळे, बाबुराव नागणे, दिलीप नागणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच एखतपुर ग्रामस्थांच्या वतीनेही एखतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील सर्व ...

बुद्धगया येथे टेम्पल कायदा अस्तित्वात असल्याने सदरचा कायदा रद्द करून मंदिर व्यवस्थापनासाठी फक्त बौद्ध धर्मीयांची नियुक्ती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन..!

Image
  बुध्दगया येथे भगवान बुध्दांना ज्ञानप्राप्ती आली. ज्ञानच जगात श्रेष्ठ आहे. डॉ. बाबासाहेब आबेडकर ज्ञानाचीच प्राप्ती केली म्हणून त्याना संविधान लिहिण्याचा अधिकार मिळाला. सध्या बुद्धगया येथे टेम्पल कायदा अस्तित्वात असून सदरचा कायदा रद्द करून त्या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी फक्त बौद्ध धर्मियांची नियुक्ती करण्यात यावी व सदरचे महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावी अशी आमची मागणी आहे. सदरची मागणी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून हे निवेदन रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष सागर गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्रा.दिग्विजय रोंगे यांना पीएच.डी.प्राप्त

Image
 गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात सहाय्यक प्राध्यापक असलेले प्रा.दिग्विजय दादासाहेब रोंगे यांना नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूरमधून अभियांत्रिकी मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात ‘ऑप्टिमल डिझाईन ऑफ मायक्रोकॉम्पोनन्ट्स फॉर मायक्रोफ्लुईडीक अॅप्लिकेशन्स' या विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोध निबंध पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठामध्ये सादर केला होता. त्यांच्या या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत आहे.         पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने प्रा. दिग्विजय रोंगे यांनी पीएच.डी. पूर्ण केली. प्रा. दिग्विजय रोंगे यांनी मायक्रोफ्लुइडिक्स क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. ज्यामध्ये मायक्रोफ्लुइडिक उपकरणांची कार्य...

स्वेरीने साजरा केला ‘रोटी डे'... स्वेरीच्या एमबीएमधील विद्यार्थ्यांचा उपक्रम!

Image
  मागील काही  दिवसांपासून आपल्यातील तरुणाई ही पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत विविध डे साजरा करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामाजिक भान हरपलेली ही तरुणाई अंधकारमय भविष्याच्या दिशेने जात असल्याचे आपण पाहत आहोत. ‘उद्याच्या भारताचे आपण आधारस्तंभ आहोत' याचा जणू या तरुणाईला विसर पडलेला असल्याचे आपल्याला जाणवते. अशा मुल्यहिन संस्कृती मधून तरुणाईला वेळीच बाहेर काढणे गरजेचे आहे म्हणून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व एम.बी.ए.चे विभागप्रमुख डॉ. कमल गलानी यांच्या नेतृत्वाखाली नुकताच ‘रोटी डे’ साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे पंढरपूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे.         स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे व एम.बी.ए.चे विभागप्रमुख डॉ. कमल गलानी यांच्या मार्गदर्शनाखाली एम.बी.ए. विभागामधील विद्यार्थ्यांनी काहीतरी वेगळा असा सामाजिक उपक्रम करायचे ठरवले. स्वेरीच्या एम. बी. ए. चा प्रत्येक विद्यार्थी योगदानासाठी पुढे सरसावला. या अनुषंगाने स्वतःच्या घरून कोणी चपात...

जागतिक महिला दिनानिमित्त पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने सफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा केला सन्मान..!

Image
 पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंढरपूर नगर परिषदेमधील सफाई कर्मचाऱ्यांनसाठी विशेष हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या महिला मेळाव्याचे उद्घाटन मुख्याधिकारी प्रशांत जाधव व सौ.मीराताई जाधव यांच्या शुभहस्ते कार्यकारी संचालक कॅम फाउंडेशन स्मिता सिंग,उपमुख्याधिकारी अँड .सुनिल वाळूजकर,नगर अभियंता नेताजी पवार, मुख्य लेखापाल करुणा शेळके,जनसंपर्क अधिकारी सुवर्ण हाके,विजयालक्ष्मी तोडकर, आरोग्य अधिकारी नागनाथ तोडकर,खरेदी पर्यवेक्षक विजय शहाणे,पाणी पुरवठा अभियंता राज काळे ,आरोग्य निरीक्षक नाना गोरे,अनिल अभंगराव यांच्या प्रमुख उपस्थित योग भवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी सांगितले की,आज प्रथमच  पंढरपूर नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. पंढरपूर शहरांमध्ये वर्षभरात चार मोठ्या यात्रा व प्रत्येक शनिवारी रविवारी यात्रेसारखी गर्दी होत आहे. आणि दररोजच्या साफसफाईच्या  कामातून महिला सफाई कर्मचारी यांना वेगळे वातावरणात न्यावे,त्यांचा कौटुंबिक शारीरिक मानसिक ताण तणाव कमी ...

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न..!

Image
  उजनी कालवा समितीच्या बैठकीत आष्टी उपसा सिंचन योजनेतून सारोळे पाझर तलाव भरून घेण्यासाठी आ.राजू खरे यांनी दिले पत्र ..! आज मुंबई या ठिकाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आष्टी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात यावे, मोहोळ मतदारसंघातील सारोळे या गावामध्ये असलेल्या पाझर तलावात आष्टी उपसा सिंचन योजनेतून भरून घेण्यात यावे, नदी काठावर असलेलल्या बंधाऱ्यांची पाणी गळती न होण्यासाठी बंधाऱ्यांची बॅरेगेज बदलून मिळावे.. तर पंढरपूर शहरातील लोकांसाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यात यावे. असे अनेक प्रश्न मोहोळ मतदारसंघातील कामांना चालना मिळावी यासाठी आमदार राजू खरे यांनी मांडला गेला....  यावेळी या बैठकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजीत पाटील,समाधान आवताडे व यासह जलसंपदाचे चीप इंजिनियर, कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे विभागाचे कार्यकारी संचालक, उजनी जलाशयाचे अभियंता व जिल्ह्यातील अधिकारी कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते..

कालवा सल्लागार समितीचे बैठकीत आ.समाधान आवताडे यांची तळमळ मतदार संघातील शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठीच आक्रमक

Image
पुणे येथे  झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे  पाणीदार आमदार समाधान  आवताडे यांनी आवर्जून  उपस्थित राहून, मतदारसंघातील पाण्यासाठी या बैठकीत  आक्रमक होत शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्याची अडचण दूर करण्यासाठीच मोठी तळमळ दिसुन आली. सदरची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री .अजित पवार  यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा मंत्री .ना.राधाकृष्ण  विखे-पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीत नीरा डावा कालवा, नीरा उजवा कालवा या प्रकल्पांच्या उन्हाळी हंगाम २०२४-२५ साठी सिंचनाच्या पाण्याच्या नियोजनावरही यावेळी चर्चा करण्यात आली.नीरा भाटघर उजव्या कालव्याखालील सिंचन टेल टू हेड या पद्धतीने पद्धत राबवून प्रत्येक नळीवर बारकाईने लक्ष देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणे गरजेचे आहे. नीरा उजवा कॅनोलद्वारे शेती सिंचन अवघड झाले असून कासेगांव, अनवली, बोहाळी, टाकळी, कोर्टी, रांझणी, खर्डी, उंबरगाव, एकालासापूर, तावशी ही गावे ओलीताखाली आहेत मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीच्या आणि गलथान कारभारामुळे बरेच शेतकरी गेल्या व...