Posts

Showing posts from October, 2025

स्वेरीच्या इ. अँड टी.सी.विभागात दोन आठवड्यांची कार्यशाळा संपन्न..!

Image
 गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट् संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या  इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात ‘पीसीबी डिझाईन आणि डेव्हलपमेंट’ या विषयावर तब्बल १२ दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली.  तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा ऑफलाइन मोडमध्ये या विभागात घेण्यात आली. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व विभागप्रमुख डॉ. सुमंत आनंद यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा सॉफकॉन् इंडिया प्रा. लि., पुणे च्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. शुभम शर्मा आणि शिवम मिश्रा हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून या कार्यशाळेत उपस्थित होते. डॉ. सुदेम डॅमरि यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रिंटेड सर्किट बोर्ड (पीसीबी) डिझाईन आणि निर्मिती याबद्दल सखोल ज्ञान देणे हा होता. कार...

पूरग्रस्तांना मदत करताना कर्तव्याची जाणीव असणे गरजेचे - सीमा पाटील

Image
 २००० महिलांना साडी वाटप तर १५०० कुटुंबांना किटचे वाटप... महापुरामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत करत असताना मी कर्तव्याची जाणीव ठेवून ही मदत करत आहे. मी श्रीमंत नाही. किंवा मी कारखानदार नाही. पण तुम्हाला काहीतरी मदत करणे हे माझं कर्तव्य समजत असल्याचे मत शिवसेना नेत्या सीमा पाटील यांनी व्यक्त केले. मोहोळ तालुक्यात सिना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तालुक्यात नरखेड जवळ नागझरी सिनानदी संगम आहे. तर भोयर्याजवळ  सिना भोगावती नदीचा संगम होतो. आणि शिरापूर येथे  वांगीरा ओढा सीना नदीला येऊन मिळतो . या  नदीकाठच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी नारीशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने दोन हजार महिलांना गावोगावी जाऊन साड्याचे वाटप सीमा पाटील यांनी केले. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, नरखेड ,भोयरे ,एकुरके ,वाळुज ,देगाव, डिकसळ, आष्टे, शिरापूर (सो), राम हिंगणी ,नांदगाव, मुंडेवाडी, गोटेवाडी या १३ गावांमध्ये मदत वाटप प्रसंगी पाटील या बोलत होत्या. पूरग्रस्त महिलांच्या मदतीसाठी नारीशक्ती फाउंडेशनने आव्...

काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची मोहोळ शहर काँग्रेस अध्यक्षपदी किशोर पवार यांची निवड..

Image
 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी नवीन जम्बो पदअधिकारी कार्यकारणी जाहीर झाली यामध्ये मोहोळ शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा किशोरराजे पवार यांची निवड करण्यात आली पक्षाशी एकनिष्ठ पक्षाने दिलेली सर्व आदेश, कार्यक्रम व केलेल्या कार्याची नोंद घेत देशाचे नेते केंद्रीय गृहमंत्री  मा,सुशील कुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सोलापूर लोकसभा खासदार प्रणितीताई शिंदे, सोलापूर जिल्हा काँग्रेस निरीक्षक माजी आमदार मोहन जोशी, यांच्या आदेशाने सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रा,सातलिंग शटगार यांनी मोहोळ शहर काँग्रेस अध्यक्षपदी किशोर पवार यांची नियुक्ती करण्यात आली. आगमी येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष मजबूत करण्यासाठी निवड करण्यात आली..  निष्ठावान व कार्यक्षम कार्यकर्त्याला न्याय मिळाला म्हणून शहरात व तालुक्यात पदाधिकारी / कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रगल्भ विचार मांडणे गरजेचे - डायरेक्टर सुरज शर्मा      

Image
 पंढरपूर –  ‘शैक्षणिक प्रणाली आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील अंतर कमी करणे, विचार आणि कल्पना यांना प्रत्यक्ष साकार करण्याची संधी मिळवणे हेच या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे प्रमुख उद्दीष्ट आहे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान घेणे पुरेसे नाही तर त्यांनी आपले प्रगल्भ विचार, नव संकल्पना आणि तांत्रिक कौशल्य ह्या बाबी प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये वापरून समस्या सोडवायला हव्यात. ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ विद्यार्थ्यांना अशा संधी आपल्याला उपलब्ध करून देते ज्यातून ते उद्योग, शिक्षण व सरकारी संस्थांसमोर आपली सर्जनशील क्षमता सिद्ध करू शकतात.’ असे प्रतिपादन कोडशेफचे ऑपरेशन्स डायरेक्टर सुरज शर्मा यांनी केले.  गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये दि.२३ सप्टेंबर २०२५ रोजी ‘स्वेरीज् स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) २०२५’ महाविद्यालयीन स्तरावर हॅकेथॉन स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे उद्दीष्ट स्पष्ट करताना कोडशेफचे ऑपरेशन्स डायरेक्टर सुरज शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार सांगत होते. ही...

पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते मा.आ.कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण..!

Image
 येणाऱ्या पिढ्यांना कृतिशील आणि सत्वशील राजकारणाची प्रेरणा देत राहो यासाठी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या आवारात पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण शुभारंभ..! कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या आवारात, माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण सोहळा तसेच १० हजार मे.टन विस्तारीकरण गाळप व पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्य सहकार परिषद अध्यक्ष राजन पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाषबापु देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार ...