दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ आ. रोहित पवार यांच्याकडून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला रुग्णवाहिका अर्पण!
पंढरपूर: "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी" या उक्तीप्रमाणे, वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला रुग्णसेवेसाठी एक सुसज्ज रुग्णवाहिका लोकार्पित करण्यात आली आहे. पंढरपूर: "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी" या उक्तीप्रमाणे, वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला रुग्णसेवेसाठी एक सुसज्ज रुग्णवाहिका लोकार्पित करण्यात आली आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही रुग्णवाहिका भेट दिली आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्तनिवास परिसर येथे या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी रोहित पवार यांचे सहकारी डॉ. योगेश रणदिवे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) सोलापूर जिल्हा संघ...