Posts

Showing posts from July, 2026

स्वेरीच्या क्षितीजा उराडे यांची ‘टेक्नीमोंट प्रा.लि.’ या कंपनीत निवड..वार्षिक पॅकेज रु.७ लाखांचे

Image
     ‘टेक्नीमोंट प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात अंतिम वर्षात शिक्षण असलेल्या क्षितीजा हिरामण उराडे यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून  यंदा देखील विक्रमी प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांचा स्वेरीकडे अधिक कल दिसत आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे  प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.             ‘टेक्नीमोंट प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागामधील अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या क्षितीजा हिरामण उराडे यांची निवड केली. उराडे यांना वार्षिक रु. ७ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमधून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्...

स्वेरीच्या निखील जाधव यांची ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रा.लि.’ या कंपनीत निवड.!

Image
 नोकरीच्या तब्बल ४७३ पेक्षा जास्त संधी  पंढरपूरः ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’  या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे निखील नवनाथ जाधव यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून यंदा देखील चांगल्या प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांचा स्वेरीकडे अधिक कल दिसत आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे  प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागामधील अंतिम वर्षात शिक्षण घेणारे निखील नवनाथ जाधव यांची निवड केली असून त्यांना वार्षिक रु. ४ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमधून प्लेसमेंटच्या माध्...

स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची ‘अॅक्वा चिल सिस्टम्स इंडिया प्रा.लि.’ या नामांकित कंपनीत निवड..!

Image
 ‘अॅक्वा चिल सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या निवड प्रक्रियेतून गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.      ‘अॅक्वा चिल सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील अवधूत अशोक भोसले व रोहन माणिक रोकडे या दोन विद्यार्थ्यांची निवड केली. ‘अॅक्वा चिल सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी २८ वर्षे जुनी असून १९९७ साली स्थापन झाली आहे. ही कंपनी प्रामुख्याने एचव्हीएसी या क्षेत्रात कार्यरत आहे. लवकरच ही कंपनी एक हजार कोटी टर्न ओव्हरचे ध्येय गाठणार आहे. एचव्हीएसी हे एक विशेष कार्यक्षेत्र आहे. त्याचा उपयोग फार्मसी, दवाखाने, मेकॅनिकल आणि इतर बऱ्याच विभागात होतो. यामुळे विद्यार्थ्यांना अशा विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आह...

स्वेरी अभियांत्रिकीत जपानी भाषा कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Image
पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने डिग्री इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी ‘जपानी भाषा आणि करिअरच्या संधी’ या विषयावर एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना जागतिक रोजगाराच्या संधी, जपानी भाषा, संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय करिअरविषयी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.           कार्यशाळेस ‘मोसाईक प्रायव्हेट लिमिटेड’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हिरो इशिदा हे प्रमुख अतिथी व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच इंडो-जपान कौन्सिलचे श्रीकांत गुंजाळ यांनी विशेष वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वेरी या संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली या क...