गोपाळपूर येथे स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान उत्साहात!
पंढरपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार तसेच स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) विभागामार्फत दि. २२ जुलै २०२६ रोजी गोपाळपूर येथे 'स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी' या स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, प्रशासकीय अधिकारी, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान दिलीप गुरव यांनी स्वच्छता, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धन याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. संजय मुजमुले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना समाजसेवेची प्रेरणा देणारे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. एम. एम. पवार आणि डॉ. नीता तळवलकर यांनी केले. या अभियानाद्वारे स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने समाजापुढे आदर्श निर्माण केला.
चौकट- भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छतेबाबत केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून स्वेरीचे संस्थापक प्रा. डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली संस्थेतील एन.एस.एस. विभाग, स्वयंसेवक व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गोपाळपूर येथे हे स्वच्छता अभियान आयोजित केलेले होते. या अभियानास संस्थेतील सर्व घटकांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Comments
Post a Comment