पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!
खरंतर यापूर्वी असं म्हटलं जात होतं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.. याच कारण अस की वर्षानुवर्षे चालणारे खटले..आता मात्र अत्यंत कमी वेळात कमी खर्चात अनेक प्रकरण मिटवली गेलेत.. तेही लोक न्यायालय अंतर्गत..
लोकन्यायालय हे न्यायालयाबाहेरचे विवाद सामंजस्याने कमी खर्चात आणि लवकर सोडवणारे एक महत्त्वाचं कायदेशीर ठरलेलं व्यासपीठ.. खरंतर लोकन्यायालय विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 अंतर्गत वैज्ञानिक दर्जा आहे.. या लोकन्यायालयाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे अनेक प्रकरण हे तडजोड व परस्पर संमतीने सोडवले जातात.. आणि याचा अंतिम निर्णय हा दिवाणी न्यायालयाचा आदेश मानला जातो आणि तो अंतिम व बंधनकारक असून या निर्णयाविरुद्ध अपीलही करता येत नाही..
याच अनुषंगाने आज पंढरपूर न्यायालयमध्ये मुख्य न्यायाधीश श्रीमती मिटकरी मॅडम, श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती धुमाळ मॅडम, देशमुख सर,बनसोडे सर यांच्यासह वकीलसंघाचे अध्यक्ष ॲड.विकास भोसले व अनेक पक्षकारांचे वादी व प्रतिवादी वकीलाकडून मोलाचे सहकार्य करत लोक न्यायालयमध्ये अत्यंत उत्साह वातावरणामध्ये अनेक प्रकरण सोडविले गेले..याबद्दल पक्षकार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते..



Comments
Post a Comment