पंढरपूर! आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी 24 ते 26 जुलै दरम्यान महाआरोग्य शिबिर!

पंढरपूर! दिनांक 23 आषाढीवारी 2026 च्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 26 जुलै 2026 या कालावधीत पंढरपूर येथील तीनरस्ता परिसरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.



 या महाआरोग्य शिबिरात वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी,उपचार,औषधोपचार,आरोग्यसल्ला तसेच विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.तसेच गंभीर रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्स सेवा सज्ज ठेवण्यात आली असून तातडीच्या उपचारांसाठी विशेष वैद्यकीय पदके ही कार्यरत असणार आहेत.

 याशिवाय आरोग्य संपन्नवारी मोबाईल ॲपद्वारे जवळच्या आरोग्य सुविधांची माहिती रुग्णवाहिका सेवा आरोग्य केंद्रांचे तपशील आणि आपत्कालीन संपर्क उपलब्ध होणार आहेत. शिबिरात आरोग्य शिक्षण प्रतिबंधात्मक उपाययोजना चरणसेवा तसेच आपत्कालीन वैद्यकीय मदत यांचाही समावेश आहे. वारीदरम्यान प्रत्येक वारकऱ्याला वेळेत आणि गुणवत्ता पूर्ण आरोग्यसेवा मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून वारकरी भाविकांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाने केला आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वेरीची एआयसीटीईच्या 'परम शवक' या उपक्रमासाठी निवड!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!