दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ आ. रोहित पवार यांच्याकडून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला रुग्णवाहिका अर्पण!

 पंढरपूर: "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी" या उक्तीप्रमाणे, वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला रुग्णसेवेसाठी एक सुसज्ज रुग्णवाहिका लोकार्पित करण्यात आली आहे. 


पंढरपूर: "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी" या उक्तीप्रमाणे, वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला रुग्णसेवेसाठी एक सुसज्ज रुग्णवाहिका लोकार्पित करण्यात आली आहे. 
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार  यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही रुग्णवाहिका भेट दिली आहे.



पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्तनिवास परिसर येथे या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी रोहित पवार यांचे सहकारी डॉ. योगेश रणदिवे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) सोलापूर जिल्हा संघटक सुधीर भोसले, रणजीत पाटील यांच्यासह मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णसेवा
पंढरपुरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. वारीच्या काळात भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा असतो. ही गरज ओळखून, दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या रुग्णवाहिकेमुळे मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळणे आता अधिक सुलभ होणार आहे.

आध्यात्मिक अधिष्ठानासह सामाजिक बांधिलकी

मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, "विठ्ठल चरणी येणाऱ्या भक्तांची सेवा हीच खरी भक्ती आहे. अशा सामाजिक कार्यामुळे वारकरी संप्रदायाला आणि भाविकांना मोठा आधार मिळतो..!



Comments

Popular posts from this blog

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!

स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूह २.०’ संपन्न!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!