पूरग्रस्तांना मदत करताना कर्तव्याची जाणीव असणे गरजेचे - सीमा पाटील
२००० महिलांना साडी वाटप तर १५०० कुटुंबांना किटचे वाटप...
महापुरामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत करत असताना मी कर्तव्याची जाणीव ठेवून ही मदत करत आहे. मी श्रीमंत नाही. किंवा मी कारखानदार नाही. पण तुम्हाला काहीतरी मदत करणे हे माझं कर्तव्य समजत असल्याचे मत शिवसेना नेत्या सीमा पाटील यांनी व्यक्त केले.
मोहोळ तालुक्यात सिना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तालुक्यात नरखेड जवळ नागझरी सिनानदी संगम आहे. तर भोयर्याजवळ सिना भोगावती नदीचा संगम होतो. आणि शिरापूर येथे वांगीरा ओढा सीना नदीला येऊन मिळतो . या नदीकाठच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी नारीशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने दोन हजार महिलांना गावोगावी जाऊन साड्याचे वाटप सीमा पाटील यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, नरखेड ,भोयरे ,एकुरके ,वाळुज ,देगाव, डिकसळ, आष्टे, शिरापूर (सो), राम हिंगणी ,नांदगाव, मुंडेवाडी, गोटेवाडी या १३ गावांमध्ये मदत वाटप प्रसंगी पाटील या बोलत होत्या.
पूरग्रस्त महिलांच्या मदतीसाठी नारीशक्ती फाउंडेशनने आव्हान केले होते. एक साडी पूरग्रस्त बहिणीला द्या. या माध्यमातून मोहोळ ,नाशिक ,धुळे ,पंढरपूर, पुणे येथील महिलांनी सुमारे दोन हजार साड्या पाठवून दिल्या. तर दानशूर नागरिक ,महिला मंडळ ,बचत गट व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पूरग्रस्त महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
१३ गावात दिवाळीचे औचित्य साधून साडी चोळी व दिवाळी किट प्रत्येक ग्रामपंचायतला आकाश कंदील, लहान मुलांना फटाके, मिठाई देण्यात आली.
या अभियानात नारीशक्ती फाउंडेशनच्या दीपाली साठे ,प्रज्ञा माळी, डॉ अश्विनी माने ,डॉ. अश्विनी मोहिते डॉ देठे ,डॉ स्नेहल गायकवाड डॉ वर्षा थोरात , डॉ शितल होळकर ,मनिषा गायकवाड , मंगल आतकारे ,कविता हावळे , ॲड .सुचिता वनकळसे ,प्रा सुप्रिया देशमुख ,शुभंगी शेंडे ,दुर्गा हंचे ,शुभांगी मोरे, वनिता माडकर ,संजीवनी चराटे ,सुरेखा गायकवाड ,गंगा कुरडे ,महानंदा आंडगे ,स्वप्ना कोकाटे, स्वाती थिटे ,तारामती सुरवसे, पांचाळ ताई ,प्रा सीमा गायकवाड, वंदना चव्हाण ,अंजली चव्हाण, चंदा दळवी ,स्वाती गायकवाड, दीक्षा गायकवाड , गायत्री काळे,भाग्यश्री अबुज ,स्नेहल सुरवसे, रेखा कांबळे ,पिंकी भांगे ,वर्षा डोके, मीरा मांडवे, मनीषा काळे, सुरेखा वाघमारे ,सुरेखा गायकवाड बिस्मिल्ला शेख, सुलोचना पाटील, पुष्पा पवार ,सुचिता गवळी ,सुजाता माने ,भारती बरे ,गीतांजली विभूते, प्रतिभा राऊत, शामल झुंजार ,स्नेहल गायकवाड, प्रियंका केवळे गौरी काळे अश्विनी चौधरी सविता जवंजाल या महिलांनी परिश्रम घेतले.



Comments
Post a Comment