जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न..!

 उजनी कालवा समितीच्या बैठकीत आष्टी उपसा सिंचन योजनेतून सारोळे पाझर तलाव भरून घेण्यासाठी आ.राजू खरे यांनी दिले पत्र..!




आज मुंबई या ठिकाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आष्टी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात यावे, मोहोळ मतदारसंघातील सारोळे या गावामध्ये असलेल्या पाझर तलावात आष्टी उपसा सिंचन योजनेतून भरून घेण्यात यावे, नदी काठावर असलेलल्या बंधाऱ्यांची पाणी गळती न होण्यासाठी बंधाऱ्यांची बॅरेगेज बदलून मिळावे.. तर पंढरपूर शहरातील लोकांसाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यात यावे. असे अनेक प्रश्न मोहोळ मतदारसंघातील कामांना चालना मिळावी यासाठी आमदार राजू खरे यांनी मांडला गेला.... 

यावेळी या बैठकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजीत पाटील,समाधान आवताडे व यासह जलसंपदाचे चीप इंजिनियर, कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे विभागाचे कार्यकारी संचालक, उजनी जलाशयाचे अभियंता व जिल्ह्यातील अधिकारी कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते..



Comments

Popular posts from this blog

स्वेरीची एआयसीटीईच्या 'परम शवक' या उपक्रमासाठी निवड!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!