जागतिक महिला दिनानिमित्त पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने सफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा केला सन्मान..!

 पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंढरपूर नगर परिषदेमधील सफाई कर्मचाऱ्यांनसाठी विशेष हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या महिला मेळाव्याचे उद्घाटन मुख्याधिकारी प्रशांत जाधव व सौ.मीराताई जाधव यांच्या शुभहस्ते कार्यकारी संचालक कॅम फाउंडेशन स्मिता सिंग,उपमुख्याधिकारी अँड .सुनिल वाळूजकर,नगर अभियंता नेताजी पवार, मुख्य लेखापाल करुणा शेळके,जनसंपर्क अधिकारी सुवर्ण हाके,विजयालक्ष्मी तोडकर, आरोग्य अधिकारी नागनाथ तोडकर,खरेदी पर्यवेक्षक विजय शहाणे,पाणी पुरवठा अभियंता राज काळे ,आरोग्य निरीक्षक नाना गोरे,अनिल अभंगराव यांच्या प्रमुख उपस्थित योग भवन येथे साजरा करण्यात आला.




यावेळी बोलताना मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी सांगितले की,आज प्रथमच  पंढरपूर नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. पंढरपूर शहरांमध्ये वर्षभरात चार मोठ्या यात्रा व प्रत्येक शनिवारी रविवारी यात्रेसारखी गर्दी होत आहे. आणि दररोजच्या साफसफाईच्या  कामातून महिला सफाई कर्मचारी यांना वेगळे वातावरणात न्यावे,त्यांचा कौटुंबिक शारीरिक मानसिक ताण तणाव कमी व्हावा, या हेतूने आज हा जागतिक महिला दिन साजरा केला जात असल्याचे सांगितले. यावेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फक्त मार्गदर्शन शिबिर न घेता संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, चमचा लिंबू, रस्सीखेच व इतर खेळाच्या स्पर्धाही या ठिकाणी घेण्यात आले. या स्पर्धेमध्ये लिंबू चमचा यामध्ये प्रथम क्रमांक अर्चना पाटोळे, द्वितीय क्रमांक पूजा सर्वगोड, तृतीय क्रमांक लता काळोखे, संगीत खुर्ची या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राणी गायकवाड, द्वितीय क्रमांक मनीषा  गायकवाड, तृतीय क्रमांक तुळसा आंबोरे, तळ्यात मळ्यात या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रेशमा  चंदनशिवे, द्वितीय क्रमांक मनीषा गायकवाड, तृतीय क्रमांक राणीताई  गायकवाड रस्सीखेच या स्पर्धेमध्ये गीता  सोलंकी, मनीषा  गायकवाड, अलका ढवळे, जया  इंगळे, हेमा आठवले, रेशमा चंदनशिवे यांचा संघ विजयी ठरला या सर्व विजेत्यांना पैठणी साडी ही पारितोषिके देण्यात आली.

कार्यकारी संचालक कॅम फाउंडेशन स्मिता सिंग यांनी सफाई कर्मचारी यांना महिलांचे आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी कुटुंबातील अडचणी मानसिक ताण तणाव कमी कसा करावा जीवनात हसत खेळत कसे राहावे याबाबत मार्गदर्शन केले .

यावेळी संतोष कसबे, अभिजीत घाडगे, दत्तात्रय चंदनशिवे,अनिल गोयल ,दत्ता माने ,रवी ढवळे ,उत्तम ढवळे ,हिम्मत गोयल,अमोल सर्वगोड, वैभव दंदाडे, विशाल गांडुळे संजय कुलकर्णी इत्यादींनी परिश्रम घेतले.

यावेळी नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख 100 महिला सफाई कर्मचारी सर्व शिपाई मुकदम  उपस्थित होते आजच्या या कार्यक्रमाने एक वेगळा आनंद महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!

स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूह २.०’ संपन्न!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!