मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांचा गौरव; मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे पाटील यांच्याकडून प्रेरणादायी उपक्रम!

        महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कै. शंकरराव मोहिते पाटील विद्यालय, बैरागवाडी,ढेकळेवाडी (ता. मोहोळ) येथे दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे पाटील यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.


विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. तसेच विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.


यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून कठोर परिश्रमाच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन केले. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, पर्यावरण आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारे महादेव मांढरे पाटील यांनी विद्यार्थ्यांचा गौरव करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


या कार्यक्रमास ढेकळेवाडीचे रत्न ब्रह्मदेव ढेकळे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, गावचे सरपंच टिल्लू गोरे, माजी सरपंच राजेभाऊ ढेकळे, शंकर आप्पा ढेकळे, ग्रा.पं.सदस्य शिवाजी तनपुरे, सुधाकर लाटे, उत्तम मांढरे, निवृत्ती पौळ,भारत ढेकळे,रोहित मांढरे, अंगत सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास शिंदे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजसाहेब ठाकरे आणि अमितसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शिक्षणाबरोबरच सामाजिक व पर्यावरणीय जाणीवा रुजविण्याचा संदेश देणारा उपक्रम म्हणून त्याची परिसरात चर्चा होत आहे. विशेषतः महादेव मांढरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आणि त्यांच्या भविष्यातील यशासाठी नवी ऊर्जा दिली.

Comments

Popular posts from this blog

स्वेरीची एआयसीटीईच्या 'परम शवक' या उपक्रमासाठी निवड!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!