स्वेरीमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी!

पंढरपूर - गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्वेरीचे संस्थापक व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. 


       याप्रसंगी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी हे उपस्थित होते. सुरवातीला डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाच्या विभागप्रमुख डॉ. नीता तळवलकर यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, शाहिरी, पोवाडे, लावणी व ग्रामीण साहित्य यावर सविस्तर माहिती दिली. मराठी साहित्य क्षेत्रात अण्णाभाऊंच्या लेखन प्रतिभेने ग्रामीण भागातील साहित्याचे दालन अधिक समृद्ध आणि देखणे केले कारण लोकशाहीर अण्णाभाऊंच्या साहित्यात आणि शाहिरीमधून कधीही नकारात्मकता दिसत नाही. बालपणी प्रतिकूल परिस्थितीमुळे आयुष्यातील केवळ एकच दिवस शाळा शिकणाऱ्या अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून समाजाला प्रेरणादायी मार्गदर्शन केले.’ असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरीचे सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, डॉ. धनंजय चौधरी, पालकवर्ग, विद्यार्थी व विद्यार्थीनी आदी उपस्थित होते. 

छायाचित्र- स्वेरीमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करताना डॉ. गोविंद कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी पवार, डॉ. नीता तळवलकर, इतर प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व विद्यार्थिनी.

Comments

Popular posts from this blog

स्वेरीची एआयसीटीईच्या 'परम शवक' या उपक्रमासाठी निवड!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!