Posts

पंढरपूर अर्बन बँकेची उतुंग झेप.. मागील आर्थिक वर्षात 38.42 कोटींचा निव्वळ नफा!

Image
  पंढरपूर अर्बन बँकेस सन 2024-25 या आर्थिक वर्षात रू.38.42 कोटी रूपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी 113 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिली. यावेळी त्यांनी शासनाच्या व्याज परतावा योजनांची कर्जाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. बँकेची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या कर्मयोगी सभागृह, शाखा नवीपेठ, पंढरपूर येथे गुरूवार दि.14 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे कुटुंबप्रमुख मा.आ.प्रशांत परिचारक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संखने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितीत सभासदांचे प्रशिक्षण पार पडले. प्रास्ताविकात बोलताना बँकेचे चेअरमन सतीश मुळे म्हणाले की, प्रधान कार्यालय व 30 शाखासह कार्यरत असणारे आपलया बँकेच्या आर्थिक वर्ष मार्च 2025 अखेर ठेवी रू.1391.47 कोटी, कर्जे रू.916.24 कोटी असून एकूण रू.2307.71 कोटी इतका मिश्र व्यवसाय झाला असून तरतूदी वजा जाता निव्वळ नफा रू.2.20 कोटी झाला आहे. सभासदांच्या, ग्राहकांच्या विश्वासावरच बँक व्यवसायवृध्दी करीत आहे. 2024-25 या अहवा...

2025 आषाढी यात्रेच्या निमित्ताने वारकरी भाविकांना पंढरपूर नगर परिषदेकडून नम्र आवाहन

Image
  झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग..  पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांच्या वतीने आषाढी यात्रा 2025.. स्वच्छ भारत अभियान.. स्वच्छ महाराष्ट्र अभियान..स्वच्छ संरक्षण 2025..माजी वसुंधरा यांच्या वतीने यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन करण्यात आले, पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी असून या नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे स्वागत करत चंद्रभागा नदीचे व पंढरपूर नगरीचे पवित्र व स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य समजून व सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी सर्व सूचनांचे पालन करत सहकार्य करण्याची देखील विनंती पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे व प्रांत अधिकारी सचिन इथापे यांच्यावतीने करण्यात आले..  यात्रेकरू दिंडीकरी व फडकरी तसेच भाविक भक्तांना भक्ती सागर म्हणजे 65 एकर या परिसरात राहण्याची सोय केलेले आहे... उघड्यावर शौचास बसू नये व प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणीच शौचालयाचा वापर करावा... जेवणासाठी थर्माकोल प्लास्टिक पत्रावळी वापरू नये तसेच कॅरीबॅगचाही वापर टाळावा व पर्यावरणाचा समतोल साधावा...आपला मठ व संस्थेमध्ये ओला सुका कचरा वेगवेगळा साठवून ठेवून ती नगरपालिकेची घंट...

मी सध्या कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाच्या चर्चेमध्ये माझं नाव जोडणे यामध्ये कोणतेही तथ्य नाही : मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांचे स्पष्टीकरण!

Image
प्रसार माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या बातम्या प्रसारित होत आहेत. यामध्ये माझ्या नावाची उलट सुलट चर्चा सुरू आहे मात्र,  मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्यामुळे माझे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी जोडणे यामध्ये कोणतेही तथ्य नाही असे मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.   दरम्यान याबाबत मा.आ.दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची  भूमिका सध्या तटस्थ आहे. यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे प्रामाणिक काम केलेले आहे. असे ही त्यांनी सांगितले आहे. यामुळे प्रसार माध्यमातून सुरू असलेल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या चर्चेला मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.

पी.एम.किसान योजना व आष्टी उपसा सिंचनमधील नुकसान भरपाई मिळणेबाबत मनसे शेतकरीसेनेचे जिल्हाध्यक्षकडून कृषीमंत्र्यांना निवेदन..!

Image
 मागील दोन चार पाच दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे रविवारी एका दिवसात राज्यात सरासरी 120 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे मान्सूनपूर्व पावसाचा पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्यांना अधिक फटका बसला आहे या पावसामध्ये नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी व महसूल विभागाला दिले आहेत पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल अशी घोषणा खुद्द कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज दिले. त्या अनुषंगाने आज यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे यांनी जाधववाडी मोडनिंब या गावातील आष्टी उपसा सिंचन योजनेमधील फळबागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळाली नसल्याच्या कारणाने तसेच 59 19 82 व्हिलेज कोड हा सातबारा उतारा आणि पीएम किसन पोर्टलवर उलट व्हिलेज दाखवत नसल्याने पी.एम.किसान योजनेला अडचणी निर्माण होत असल्याच्या कारणाने व्हिलेज कोड दुरुस्त करून देण्याबाबत पत्र देण्यात आले. त्याचवेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ज्या लोकांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही, यावर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दे...

जनशक्ती'च्या युवक प्रदेशाध्यक्षपदी गणेश भानवसे यांची निवड..!

Image
जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्याच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी वांगी नं. २ येथील युवा कार्यकर्ते गणेश अभिमान भानवसे यांना देण्यात आली असून या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिले. शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, पोलिसांच्या, पाण्याच्या अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर जनशक्ती च्या माध्यमातून अतुल खूपसे पाटील व संघटनेने नेहमीच आवाज उठविला आहे. धडक बेधडक आंदोलन फेम म्हणून त्यांची ओळख असून संघटना वाढीसाठी आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रश्नांवर लढण्यासाठी ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर युवक प्रदेशाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी आणि महत्त्वाची धुरा गणेश भानवसे यांच्यावर दिली आहे.  या नियुक्तीनंतर बोलताना गणेश भानवसे म्हणाले की,संघटनेच्या ध्येय धोरणानुसार सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करण्यासाठी तसेच समाजातील शेतकरी, शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, निराधार, अंध, अपंग, उद्योग-व्यवसायिकांचे प्रश्न घेऊन सत्ताधारी असो वा शासन किंवा प्रशासन असो या व्यवस्थेची दोन हात करण्या...

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आ.राजू खरे यांची मागणी अन् सीना नदीत पाणी सोडण्याचे पालकमंत्र्यांकडून आदेश..!

Image
 'त्या' चार गावच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आ.राजू खरे यांनी घेतली स्पेशल बैठक! मोहोळ विधानसभा मतदारसंघातील चार गावच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता,ही बाब आमदार राजू खरे यांच्या निदर्शनास येताचं , त्यांनी  17 मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्यावेळी पालकमंत्री नामदार गोरे यांनी सदरचा प्रश्न मिटविण्याबाबत शब्द दिला होता.या प्रश्नावर आज बुधवारी कालवा सल्लागार समितीची बैठक घेत जलसंपदा मंत्री ना.विखे पाटील यांचेसमोर  आगृह धरला असता तत्काळ आ. राजू खरे यांच्या मागणीची दखल घेत, कोळेगाव  एस के एफ 22 मधून सिना नदीत पाणी सोडण्याबाबतच्या ऑनलाईन सूचना पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहेत. यामुळे त्या चार गावचा पाणी प्रश्न मिटणार असल्याची  माहिती मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी दिली आहे. मोहोळ मतदार संघातील  मुंडेवाडी, अर्जुंनसोंड, पोफळी, नांदगाव या गावांतील लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. याबाबत आमदार राजू खरे यांनी आवाज उठवला,यामु...

संपूर्ण सांगोला तालुक्यात सामाजिक उपक्रम राबवून कार्यतपस्वी स्व.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Image
 सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते आणि कार्यतपस्वी आमदार स्व. काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सांगोला शहर आणि संपूर्ण तालुक्यात शुक्रवार दि २८ मार्च रोजी विविध कार्यक्रम पार पडले. आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करताना ५२ वर्षानंतरही सामाजिक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम सांगोला तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी केले आहे. दरवर्षी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीनमित्त संपूर्ण सांगोला शहर आणि तालुक्यात विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे यंदाही शुक्रवारी दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महूद बु. येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महुद येथील विद्यार्थ्यांना महूद ग्रामस्थांच्या वतीने शालेय साहित्यांचे व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते जयवंत नागणे गुरुजी, कैलास खबाले, धनंजय पाटील, विठ्ठल बागल ,अंगद जाधव, यशवंत खबाले ,अभिषेक कांबळे, बाबुराव नागणे, दिलीप नागणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच एखतपुर ग्रामस्थांच्या वतीनेही एखतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील सर्व ...