पंढरपूर अर्बन बँकेची उतुंग झेप.. मागील आर्थिक वर्षात 38.42 कोटींचा निव्वळ नफा!
पंढरपूर अर्बन बँकेस सन 2024-25 या आर्थिक वर्षात रू.38.42 कोटी रूपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी 113 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिली. यावेळी त्यांनी शासनाच्या व्याज परतावा योजनांची कर्जाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. बँकेची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या कर्मयोगी सभागृह, शाखा नवीपेठ, पंढरपूर येथे गुरूवार दि.14 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे कुटुंबप्रमुख मा.आ.प्रशांत परिचारक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संखने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितीत सभासदांचे प्रशिक्षण पार पडले. प्रास्ताविकात बोलताना बँकेचे चेअरमन सतीश मुळे म्हणाले की, प्रधान कार्यालय व 30 शाखासह कार्यरत असणारे आपलया बँकेच्या आर्थिक वर्ष मार्च 2025 अखेर ठेवी रू.1391.47 कोटी, कर्जे रू.916.24 कोटी असून एकूण रू.2307.71 कोटी इतका मिश्र व्यवसाय झाला असून तरतूदी वजा जाता निव्वळ नफा रू.2.20 कोटी झाला आहे. सभासदांच्या, ग्राहकांच्या विश्वासावरच बँक व्यवसायवृध्दी करीत आहे. 2024-25 या अहवा...