Posts

Showing posts from March, 2026

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ आ. रोहित पवार यांच्याकडून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला रुग्णवाहिका अर्पण!

Image
 पंढरपूर: "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी" या उक्तीप्रमाणे, वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला रुग्णसेवेसाठी एक सुसज्ज रुग्णवाहिका लोकार्पित करण्यात आली आहे.  पंढरपूर: "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी" या उक्तीप्रमाणे, वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला रुग्णसेवेसाठी एक सुसज्ज रुग्णवाहिका लोकार्पित करण्यात आली आहे.  कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार  यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही रुग्णवाहिका भेट दिली आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्तनिवास परिसर येथे या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी रोहित पवार यांचे सहकारी डॉ. योगेश रणदिवे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) सोलापूर जिल्हा संघ...

यशस्वी उद्योजक हे आत्मनिर्भर भारतासाठी गरजेचे..स्वेरीत ‘टेकनिर्माण १.०’ हा तीन दिवसीय बुटकॅम्प उपक्रम संपन्न..!

Image
 आपण निर्माण केलेले उत्पादन हे समाजातील सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे असावे. यासाठी अभियंत्यांनी स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन दृष्टीकोनातून संशोधनाचा विचार करावा तसेच नेतृत्व करत असताना सोबत असणाऱ्या सर्वांना विचारत घेवून त्यांच्या कल्पनांना वाव द्यावा. अभियंत्यांनी संशोधन करताना नवीन संकल्पनांना प्रथम प्राधान्य द्यावे. स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील संशोधनाकडे गंभीरतेने पाहणे आवश्यक आहे. यातूनच भविष्यात उद्योजक घडतात. यशस्वी उद्योजक हे आत्मनिर्भर भारतासाठी गरजेचे आहेत.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाचे माजी संचालक व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी सदस्य तसेच स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एन.बी.पासलकर यांनी केले.         गोपाळपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या इलाईट क्लबतर्फे आयोजित ‘टेक निर्माण १.०’ हा सलग २४ तासांचा राष्ट्रीय स्तरावरी...

स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूह २.०’ संपन्न!

Image
 गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूह २.०’ हा सलग ३६ तासांचा तांत्रिक संशोधनपर उपक्रम संपन्न झाला. यामध्ये भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वेरीच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे बाहेरून आलेले स्पर्धक समाधानाने परतले.               दीपप्रज्वलन आणि प्रास्ताविकानंतर सर्व मान्यवरांनी ‘चक्रव्यूह २.०’ च्या पत्रकाचे अनावरण करून या तांत्रिक स्पर्धेची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. सुनीता साळसिंगिकर ह्या होत्या. त्यांच्यासह विभागप्रमुख डॉ. पी. ए. सातारकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे यांनी ‘चक्रव्यूह २.०’ सारख्या संशोधन व स्पर्धात्मक कार्यक्रमांचे महत्त्व तसेच नोकरीच्या संधींसाठी आणि कौशल्य विकासासाठी असे उपक्रम कसे उपयुक्त ठर...

यशस्वी होण्यासाठी कठीण परिश्रम, समर्पण भावना आणि शिस्त आवश्यक..!

Image
 ‘स्पर्धा परीक्षेत विचारलेले सर्व प्रश्न आत्मविश्वासाने सोडवले तर यशाची शक्यता वाढते व भविष्यात त्याचा फायदा होतो मात्र प्रयत्नात सातत्य आवश्यक आहे. अपयश आले तरी प्रयत्नात खंड पडता कामा नये, हेच स्पर्धा परीक्षा देताना महत्त्वाचे असते. परीक्षा देताना मला प्रत्येक वेळी नवीन अनुभव यायचा आणि यशाला कुठे तरी हुलकावणी मिळायची. पण यातून मी निराश न होता संघर्ष सुरूच ठेवला. एक नाही, दोन नाही तब्बल सातव्या वेळी केलेल्या प्रयत्नानंतर मी अखेर डिवायएसपी झालो. कठीण परिश्रम, समर्पण भावना आणि शिस्त या जोरावर मला अशक्य वाटणाऱ्या यशाला गवसणी घालता आली.’ असे प्रतिपादन नूतन पोलीस उपाधीक्षक तथा डीवायएसपी प्रदीप गोरड यांनी व्यक्त केले.      संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये स्पर्धा परीक्षा विषयक ‘मार्गदर्शन सत्रा’मध्ये नूतन पोलीस उपअधीक्षक प्रदीप गोरड हे आपल्या यशाचे गुपित उलगडत होते. दीप प्रज्वलनानंतर पोलीस उपाधीक्...

स्वेरीच्या रा.से.यो. स्वयंसेवकांची राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी..!

Image
पंढरपूर : राज्यस्तरीय ‘उत्कर्ष - २०२६’ या सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवाकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचा संघ निवडला गेला होता. त्यामध्ये गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील पियुष सुनील चोपडे व गौरी शिवलिंग महाजन या दोन राष्ट्रीय सेवा योजनेच्या (रा.से.यो.) स्वयंसेवकांची निवड झाली होती. त्यात पियुष चोपडे यांना विविध उपक्रमात तब्बल सहा पुरस्कार मिळाले यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.               या सांस्कृतिक महोत्सवामध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणार्‍या पियुष सुनील चोपडे यांनी स्ट्रीट प्ले (ग्रुप इव्हेंट) स्पर्धेत प्रथम क्रमांक, काव्य वाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तसेच सांस्कृतिक रॅली स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले तसेच राष्ट्रीय सेवा योजना निदेशालय, भुवनेश्वर यांच्या वतीने रा.से.यो. स्वयंसेवकांसाठी ओरिसा राज्यातील बारीपदा मधील महाराजा श्रीरामचंद्र...

स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे ‘डिपेक्स २०२६’ मध्ये यश..!

Image
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेले ओंकार बालाजी इंगळे, संदिप राजेंद्र गवळी, प्रतीक्षा शिवाजी ढेरे, पूजा भीमाशंकर मुस्के, शिवानी गणेश माळवे व तनिष्का उमेश कारंडे या सहा विद्यार्थ्यांना एमआयटी महाविद्यालय, संभाजीनगर येथे घेतलेल्या ‘डिपेक्स २०२६’ या राज्यस्तरीय प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये डिफेन्स ॲन्ड सायबर सिक्युरिटी या प्रवर्गात ' एथिकल इमेल ट्रॅकिंग ॲनालायझर विथ इंटिग्रेटेड वेब स्क्रॅपिंग फॉर रिअल टाईम पॉलिसी मॉनिटरिंग’ या प्रकल्पासाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.       महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी संभाजीनगर मध्ये आयोजित केलेले ‘डिपेक्स २०२६’ हे एक महत्त्वाचे राज्यस्तरीय प्रदर्शन होते. ‘डिपेक्स’ या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये केले जाते. त्यामध्ये नवीन प्रकल्पांचे सादरीकरण केले जाते. दि. ५ मार्च ते ०८ मार्च २०२६ दरम्यान झालेले राज्यस्तरीय प्रदर्शन हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सृजन, महाराष्ट्र इन्स्ट...

स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची इंडियन स्पेस लॅब विंटर इंटर्नशिपसाठी निवड..!

Image
 गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील तीन विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित इंडियन स्पेस लॅब विंटर इंटर्नशिप व टेक्निकल ट्रेनिंग प्रोग्रामसाठी निवड झाली असून त्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या इंटर्नशिपसाठी दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृष्णा राजेंद्र पाटील, शिवराज संदीप ढोणे आणि प्रशांत नागनाथ जाधव या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हा ४५ दिवसांचा इंटर्नशिप कार्यक्रम दि. ०२ फेब्रुवारी २०२६ ते दि. १७ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची निवड तांत्रिक परीक्षा, मुलाखत आणि अंतिम निवड अशा स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे करण्यात आली आहे.     या इंटर्नशिप अंतर्गत विद्यार्थी विविध प्रगत तांत्रिक प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करत आहेत. यामध्ये ओपन व्हीएसपी चा वापर करून सेसना -२१० विमानाचे मॉडेलिंग, फ्यूजन ३६० आणि ईझी ईडीए चा वापर करून ड्युअल रेडंडंट कॅनसॅट / क्यूबसॅट सॅटेलाइट स्ट्रक्चर डिझाईन व पीसीबी लेआउट, तसेच ओपन रॉकेटच्या सहाय्याने सिं...

माजी साखर आयुक्त डॉ.संजयकुमार भोसले यांची स्वेरीला सदिच्छा भेट..!

Image
 महाराष्ट्र राज्याचे साखर संचालक (प्रशासन) व साखर आयुक्तालयाचे माजी आयुक्त डॉ.संजयकुमार भोसले यांनी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) ला अलीकडेच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी इंजिनिअरिंग मधील प्राध्यापकांना विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.        स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांनी त्यांचे स्वागत केले. साखर आयुक्तालयातील प्रशासन व अर्थविषयक कामकाजातील जाणकार अधिकारी म्हणून माजी साखर आयुक्त डॉ. संजयकुमार भोसले यांची ओळख आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जावे लागत होते हे पाहून डॉ बी. पी. रोंगे यांनी गोपाळपूरच्या माळरानावर २८ वर्षांपूर्वी इंजिनिअरिंगची स्थापना केली तेंव्हापासून विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षणाबरोबरच  फार्मसीचे डिप्लोमा डिग्री पीजी, तसेच एमबीए, एमसीए., पीएचडी अभ्यासक्रम आणि विधी (लॉ) कॉलेज सुरु असून त्यासाठी आवश्यक सर्व सुख सोयी आहेत. पाह...

उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्यावर होणारे संस्कार महत्त्वाचे..

Image
 ‘आजच्या युगात स्त्री-पुरुष समानता आली आहे  तरी देखील यशस्वी जीवन जगण्यासाठी मुलींनी मानसिकरीत्या कणखर होणे गरजेचे आहे. फक्त पैसा कमविणे म्हणजे आयुष्य नसून एक चांगला माणूस बनणे हा आपल्या आयुष्याचा मुख्य उद्देश असावा. आई, बहीण, पत्नी, मुलगी यांच्याकडे काळजीपूर्वक पाहावे. यातूनच आपल्यावर घालून दिलेले संस्कार दिसतात. आपल्यावर संस्कार करणारे हेच असतात याच संस्कारामुळे आपल्या करिअरला योग्य दिशा मिळत असते. म्हणून उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्यावर होणारे संस्कार महत्त्वाचे असतात.’ असे प्रतिपादन मुंबई हायकोर्टाच्या अॅड. सुनीता साळसिंगीकर यांनी केले.         गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुटमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई हायकोर्टाच्या अॅड.सुनीता साळसिंगीकर ह्या उपस्थित होत्या तर विशेष अतिथी म्हणून सौ.अलका कोळेकर ह्या लाभल्या होत्या.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे हे होते. महाराष्ट्र ...