स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे ‘डिपेक्स २०२६’ मध्ये यश..!

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेले ओंकार बालाजी इंगळे, संदिप राजेंद्र गवळी, प्रतीक्षा शिवाजी ढेरे, पूजा भीमाशंकर मुस्के, शिवानी गणेश माळवे व तनिष्का उमेश कारंडे या सहा विद्यार्थ्यांना एमआयटी महाविद्यालय, संभाजीनगर येथे घेतलेल्या ‘डिपेक्स २०२६’ या राज्यस्तरीय प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये डिफेन्स ॲन्ड सायबर सिक्युरिटी या प्रवर्गात ' एथिकल इमेल ट्रॅकिंग ॲनालायझर विथ इंटिग्रेटेड वेब स्क्रॅपिंग फॉर रिअल टाईम पॉलिसी मॉनिटरिंग’ या प्रकल्पासाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.


      महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी संभाजीनगर मध्ये आयोजित केलेले ‘डिपेक्स २०२६’ हे एक महत्त्वाचे राज्यस्तरीय प्रदर्शन होते. ‘डिपेक्स’ या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये केले जाते. त्यामध्ये नवीन प्रकल्पांचे सादरीकरण केले जाते. दि. ५ मार्च ते ०८ मार्च २०२६ दरम्यान झालेले राज्यस्तरीय प्रदर्शन हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सृजन, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) यांनी आयोजित केले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये दोन हजार पाचशेहून अधिक प्रकल्पांची नोंदणी झाली होती. या उपक्रमांतर्गत सुमारे ३५० मॉडेल्सचे प्रदर्शन करण्यात आले तर सुमारे ८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परिषदेमध्ये सहभाग घेतला होता. ‘डिपेक्स २०२६’ या राष्ट्रीय परिषदेमध्ये एकूण १२ प्रकारांमध्ये प्रकल्प सादर करण्यात आले होते. ‘डिपेक्स’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्यातील नाविन्यतेची, संशोधनाची आणि तांत्रिक कौशल्यांची क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते, ज्यामुळे त्यांच्या करिअरच्या विकासास मदत होते. यावेळी स्वेरीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले व मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार व डॉ. स्वाती पवार तसेच विभागप्रमुख डॉ. प्राजक्ता सातारकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, कॅम्पस इनचार्ज डॉ. एम. एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी सहा ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!

स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूह २.०’ संपन्न!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!