Posts

Showing posts from April, 2026

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!

Image
             पंढरपूर - गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये येत्या शनिवार, दि. ०२ मे २०२६ रोजी सकाळी ०९.३० वाजता विख्यात अणुशास्त्रज्ञ तथा भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरी (ए.सी.आय.सी.-स्वेरी) चे उदघाटन होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आ.समाधान आवताडे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील, विधानपरिषदेचे माजी सदस्य प्रशांत परिचारक, मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू खरे आणि सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अतुल कुलकर्णी, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पंढरपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत डगळे, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, पंढरपूरचे तहसीलदार ...

स्वेरीत महात्मा फुले यांची १९९ वी जयंती साजरी..!

Image
 पंढरपूर- ‘समाजातील महिलांची प्रगती व्हावी यासाठी महात्मा जोतिराव फुले यांनी स्त्रीशिक्षणाची सुरवात घरापासून केली. त्यांनी प्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले. पुढे फुले दाम्पत्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा भिडे वाड्यामधून सुरु केली. तेथून महिलांच्या शिक्षणासाठी अविरत कार्य चालू राहिले. महात्मा फुले यांनी सामाजिक चळवळीतून समाजसुधारणेसाठी अविरत कार्य केले त्यामुळे त्यांच्या विचारांनी आजही समाज उजळतो.’ असे प्रतिपादन स्वेरीचे माजी विद्यार्थी, उद्योजक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुरज मस्के यांनी केले.         स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील  श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) मध्ये थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रेरक आणि जनक महात्मा जोतिराव फुले यांच्या १९९ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुरज मस्के हे मार्गदर्शन करत हो...

भूमी अभिलेख कार्यालयाच्या खात्यातील अधिकाऱ्यांची लाचेचे दरपत्रक जाहीर करणेबाबत महसूलमंत्र्यांना लिहिले पत्र..

Image
 आदरणीय नाम. चंद्रशेखर बावनकुळे. महसूल मंत्री,महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई.                              यांना सविनय सादर... विषय :- भूमी अभिलेख कार्यालयातील शासकीय कामकाजा करण्यासाठी आपल्या खात्यामधील अधिकाऱ्यांचे लाचेचे दर पत्रक जाहीर करणे बाबत... महोदय,         मी अमरजीत राजाराम पाटील.राहणार,पंढरपूर नम्र निवेदन करतो की,माझी शेत जमीन मौजे येवती,तालुका मोहोळ या गावी आहे.मी माझ्या जमिनीच्या हद्दी खुणा निश्चिती करण्यासाठी *दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी द्रुतगती रक्कम रुपये २४,०००/- ऑनलाईन पद्धतीने भरलेले आहेत.* आज आपल्या अधिकाराखाली येणाऱ्या भूमिअभिलेख कार्यालयातील कामकाज बाबत आपण राज्याच्या विधिमंडळात जमीन मोजणी संदर्भात नवनवीन घोषणा करीत आहात.परंतु,आपल्या या तथाकथित लोककल्याणकारी योजनांना हरताळ फासण्याचे काम भूमिअभिलेख कार्यालयातील कामकाज करण्याची पद्धत पाहिल्यावर केले जात असल्याचे दिसून येत आहे. आपल्या अधिकारात येत असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयात कायद्याने भरावी लागणारी शासकीय रक्कम भ...

स्वेरीच्या विद्यार्थ्याची गरुडझेप: पारस जाधवकडून ९ पेटंट्स प्रकाशित..!

Image
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या पारस प्रकाश जाधव व प्रा. आशुतोष अनिलराव गरड यांनी संशोधन व नवोपक्रम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सप्टेंबर २०२५ ते मार्च २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत एकूण नऊ पेटंट्स प्रकाशित केली आहेत. आदरयुक्त शिस्त, नाईट स्टडी, वैयक्तिक मार्गदर्शन आणि समाजोपयोगी नवकल्पना या बाबींच्या समन्वयातून महाविद्यालयाच्या यशात आणखी भर पडली आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.      पारस जाधव यांनी विकसित केलेल्या पेटंट्समध्ये सोलर पॅनल क्लिनिंग सिस्टम, ड्रोन डॉक, सॉइल मॉइश्चर सेन्सर संरक्षण, इलेक्ट्रिकल फॉल्ट डिटेक्शन ग्लोव्ह, कृषी पंपासाठी लिफ्टिंग स्टँड, सॉइल न्यूट्रिएंट अॅनालिसिस, स्मार्ट लिक्विड सिस्टम, मल्टी-सेंसर आधारित चॉपिंग बोर्ड तसेच वॉटर टँक क्लिनिंग डिव्हाइस यांसारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. ही सर्व पेटंट्स केवळ तांत्रिक नवकल्पना नसून शेतकरी व समाजासाठी ...