स्वेरी महाविद्यालयाचा इंटी विद्यापीठ, मलेशिया येथील अभ्यास दौरा संपन्न..!
पंढरपूर– गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील विद्यार्थी व प्राध्यापक प्रतिनिधी मंडळ यांचा मलेशियातील इंटी (आयएनटीआय) विद्यापीठ येथे तीन आठवड्यांचा शैक्षणिक अध्ययन दौरा नुकताच पार पडला. हा अभ्यास दौरा संस्थेच्या जागतिक संबंधांना अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे. इंटी विद्यापीठ हे १९८६ मध्ये स्थापन झाले असून मलेशियातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठाने क्यु. एस. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये ५०९ वा क्रमांक मिळविला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिकण्याची, प्रगत तंत्रज्ञानाची आणि करिअरच्या संधींची थेट ओळख व्हावी यासाठी संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याची ठळक व...