Posts

Showing posts from May, 2025

मी सध्या कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाच्या चर्चेमध्ये माझं नाव जोडणे यामध्ये कोणतेही तथ्य नाही : मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांचे स्पष्टीकरण!

Image
प्रसार माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या बातम्या प्रसारित होत आहेत. यामध्ये माझ्या नावाची उलट सुलट चर्चा सुरू आहे मात्र,  मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्यामुळे माझे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी जोडणे यामध्ये कोणतेही तथ्य नाही असे मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.   दरम्यान याबाबत मा.आ.दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची  भूमिका सध्या तटस्थ आहे. यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे प्रामाणिक काम केलेले आहे. असे ही त्यांनी सांगितले आहे. यामुळे प्रसार माध्यमातून सुरू असलेल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या चर्चेला मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.

पी.एम.किसान योजना व आष्टी उपसा सिंचनमधील नुकसान भरपाई मिळणेबाबत मनसे शेतकरीसेनेचे जिल्हाध्यक्षकडून कृषीमंत्र्यांना निवेदन..!

Image
 मागील दोन चार पाच दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे रविवारी एका दिवसात राज्यात सरासरी 120 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे मान्सूनपूर्व पावसाचा पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्यांना अधिक फटका बसला आहे या पावसामध्ये नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी व महसूल विभागाला दिले आहेत पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल अशी घोषणा खुद्द कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज दिले. त्या अनुषंगाने आज यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे यांनी जाधववाडी मोडनिंब या गावातील आष्टी उपसा सिंचन योजनेमधील फळबागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळाली नसल्याच्या कारणाने तसेच 59 19 82 व्हिलेज कोड हा सातबारा उतारा आणि पीएम किसन पोर्टलवर उलट व्हिलेज दाखवत नसल्याने पी.एम.किसान योजनेला अडचणी निर्माण होत असल्याच्या कारणाने व्हिलेज कोड दुरुस्त करून देण्याबाबत पत्र देण्यात आले. त्याचवेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ज्या लोकांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही, यावर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दे...

जनशक्ती'च्या युवक प्रदेशाध्यक्षपदी गणेश भानवसे यांची निवड..!

Image
जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्याच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी वांगी नं. २ येथील युवा कार्यकर्ते गणेश अभिमान भानवसे यांना देण्यात आली असून या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिले. शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, पोलिसांच्या, पाण्याच्या अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर जनशक्ती च्या माध्यमातून अतुल खूपसे पाटील व संघटनेने नेहमीच आवाज उठविला आहे. धडक बेधडक आंदोलन फेम म्हणून त्यांची ओळख असून संघटना वाढीसाठी आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रश्नांवर लढण्यासाठी ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर युवक प्रदेशाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी आणि महत्त्वाची धुरा गणेश भानवसे यांच्यावर दिली आहे.  या नियुक्तीनंतर बोलताना गणेश भानवसे म्हणाले की,संघटनेच्या ध्येय धोरणानुसार सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करण्यासाठी तसेच समाजातील शेतकरी, शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, निराधार, अंध, अपंग, उद्योग-व्यवसायिकांचे प्रश्न घेऊन सत्ताधारी असो वा शासन किंवा प्रशासन असो या व्यवस्थेची दोन हात करण्या...

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आ.राजू खरे यांची मागणी अन् सीना नदीत पाणी सोडण्याचे पालकमंत्र्यांकडून आदेश..!

Image
 'त्या' चार गावच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आ.राजू खरे यांनी घेतली स्पेशल बैठक! मोहोळ विधानसभा मतदारसंघातील चार गावच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता,ही बाब आमदार राजू खरे यांच्या निदर्शनास येताचं , त्यांनी  17 मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्यावेळी पालकमंत्री नामदार गोरे यांनी सदरचा प्रश्न मिटविण्याबाबत शब्द दिला होता.या प्रश्नावर आज बुधवारी कालवा सल्लागार समितीची बैठक घेत जलसंपदा मंत्री ना.विखे पाटील यांचेसमोर  आगृह धरला असता तत्काळ आ. राजू खरे यांच्या मागणीची दखल घेत, कोळेगाव  एस के एफ 22 मधून सिना नदीत पाणी सोडण्याबाबतच्या ऑनलाईन सूचना पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहेत. यामुळे त्या चार गावचा पाणी प्रश्न मिटणार असल्याची  माहिती मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी दिली आहे. मोहोळ मतदार संघातील  मुंडेवाडी, अर्जुंनसोंड, पोफळी, नांदगाव या गावांतील लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. याबाबत आमदार राजू खरे यांनी आवाज उठवला,यामु...