योग्य वेळी केलेल्या सत्कारामुळे शिक्षकांना स्फूर्ती मिळते - आ.समाधान आवताडे
पंढरपूर –'समाजात काम करताना चांगल्या माणसांच्या पाठीवर नेहमी कौतुकाची थाप पडावी या दृष्टीने डॉ.बी.पी रोंगे सरांनी उत्तमरीत्या या सोहळ्याचे आयोजन केले आहे. सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना त्यामुळे स्फूर्ती मिळते. डॉ.रोंगे सरांनी गोपाळपूरच्या माळरानावर शून्यातून विश्व उभे केले आहे, हे सारा महाराष्ट्र जाणत आहे. स्वेरीने वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष संशोधने यशस्वीपणे केली आहेत, करत आहेत. एकूणच त्यांच्या मागे डॉ. रोंगे सरांचा बारीक अभ्यास दिसून येतो.' असे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले. गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने पंढरपूर व माळशिरस तालुक्याकरिता स्वेरीत आयोजिलेल्या ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्या’ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानवरून आमदार समाधानदादा आवताडे बोलत होते. दीपप्रज्वलनानंतर श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक, कॉलेज ऑफ इंजिन...