स्वेरीच्या १७ विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीच्या 'गेट' परीक्षेत उत्कृष्ट यश!
पंढरपूर- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या ‘गेट’ अर्थात 'ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग' या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील तब्बल १७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश मिळविले आहे. या परीक्षेमध्ये संस्थेतील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली असून देशपातळीवर सर्वोच्च रॅंक ६४९ मिळवली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ओम राजू पाटील, सोहम चेतन कुलकर्णी, अनुष्का शहाजी घोडके, आदेश बाळासाहेब कोंढारे, वैष्णवी विलास मस्के, विवेक बंडू पवार, ओंकार बापुसो देशमुख, समर्थ महेश मोटे, आकाश नवनाथ चव्हाण, जय बाळासाहेब जाधवर, तुषार शंकर कर्डुले, भाग्यवान सुनील सायकर, संकेत रावसाहेब मोरे, श्रेयश दशरथ लोक...