प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाचा कॅप राऊंड-३ सोमवारपासून सुरु..!
पंढरपूर! 'शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाची तिसरी फेरी (थर्ड कॅप राऊंड) सोमवार, दि. २७ जुलै २०२६ पासून सुरु होणार असून ती प्रक्रिया मंगळवार, दि.२८ जुलै २०२६ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत स्वेरी डिप्लोमाच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. क्रमांक ६४३७) मध्ये कॅप राउंड साठी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. या प्रवेशाची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरूवार दि.३० जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.' अशी माहीती स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक) चे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी दिली. सन २०२६-२७ च्या पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज निश्चित करणे आदी प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर आता सोमवार, दि. २७ जुलै २०२६ पासून तृतीय प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे सुरु होणार असून ती प्रक्रिया मंगळवार, दि.२८ जुलै २०२६ सायंकाळी ५:०० वाजेप...