स्वेरीच्या इ. अँड टी.सी.विभागात दोन आठवड्यांची कार्यशाळा संपन्न..!
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट् संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात ‘पीसीबी डिझाईन आणि डेव्हलपमेंट’ या विषयावर तब्बल १२ दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली. तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा ऑफलाइन मोडमध्ये या विभागात घेण्यात आली. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व विभागप्रमुख डॉ. सुमंत आनंद यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा सॉफकॉन् इंडिया प्रा. लि., पुणे च्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. शुभम शर्मा आणि शिवम मिश्रा हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून या कार्यशाळेत उपस्थित होते. डॉ. सुदेम डॅमरि यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रिंटेड सर्किट बोर्ड (पीसीबी) डिझाईन आणि निर्मिती याबद्दल सखोल ज्ञान देणे हा होता. कार...