काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची मोहोळ शहर काँग्रेस अध्यक्षपदी किशोर पवार यांची निवड..
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी नवीन जम्बो पदअधिकारी कार्यकारणी जाहीर झाली यामध्ये मोहोळ शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा किशोरराजे पवार यांची निवड करण्यात आली पक्षाशी एकनिष्ठ पक्षाने दिलेली सर्व आदेश, कार्यक्रम व केलेल्या कार्याची नोंद घेत देशाचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा,सुशील कुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सोलापूर लोकसभा खासदार प्रणितीताई शिंदे, सोलापूर जिल्हा काँग्रेस निरीक्षक माजी आमदार मोहन जोशी, यांच्या आदेशाने सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रा,सातलिंग शटगार यांनी मोहोळ शहर काँग्रेस अध्यक्षपदी किशोर पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
आगमी येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष मजबूत करण्यासाठी निवड करण्यात आली..
निष्ठावान व कार्यक्षम कार्यकर्त्याला न्याय मिळाला म्हणून शहरात व तालुक्यात पदाधिकारी / कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत अभिनंदन केले.

Comments
Post a Comment