मी सध्या कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाच्या चर्चेमध्ये माझं नाव जोडणे यामध्ये कोणतेही तथ्य नाही : मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांचे स्पष्टीकरण!
प्रसार माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या बातम्या प्रसारित होत आहेत. यामध्ये माझ्या नावाची उलट सुलट चर्चा सुरू आहे मात्र, मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्यामुळे माझे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी जोडणे यामध्ये कोणतेही तथ्य नाही असे मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान याबाबत मा.आ.दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची भूमिका सध्या तटस्थ आहे. यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे प्रामाणिक काम केलेले आहे. असे ही त्यांनी सांगितले आहे. यामुळे प्रसार माध्यमातून सुरू असलेल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या चर्चेला मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.

Comments
Post a Comment