स्वेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२वी जयंती साजरी..!


पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५२ वी जयंती साजरी करण्यात आली.



         कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. नीता तळवलकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, सामाजिक न्याय, शिक्षणाचा प्रसार, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य तसेच समाजसुधारणेसाठी त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. हा कार्यक्रम स्वेरीचे संस्थापक प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार आणि विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, अधिष्ठाता, विविध विभागांचे विभागप्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे,  प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वेरीची एआयसीटीईच्या 'परम शवक' या उपक्रमासाठी निवड!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!