37 लाखांची फसवणूक व खंडणी प्रकरणात महिला डॉक्टरला जामिन; बचाव पक्षाचा प्रभावी युक्तिवाद न्यायालयाकडून ग्राह्य*

 

पुणे : 37 लाखांची फसवणूक, खंडणीची मागणी, अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी तसेच घरफोडी अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आलेल्या महिला डॉक्टरला पुणे न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिताच्या कलम 318(2), 316(2), 308(2), 305(a), 3(5), 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.



सुनावणीदरम्यान *बचाव पक्षातर्फे अॅड प्रविण जगताप ॲड. शंतनू माने अॅड रविंद्र आरो  अॅड श्रीकांत ओव्हाळ आणि ॲड. निकिता बनसोडे* यांनी प्रकरणातील तथ्ये, आरोपांतील विसंगती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीच्या बाजूने भक्कम व प्रभावी युक्तिवाद मांडला. दुसरीकडे, *फिर्यादीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे* यांनी कठोर भूमिका घेत गंभीर आरोपांचे गांभीर्य अधोरेखित करणारा युक्तिवाद केला.

दोन्ही बाजूंचे सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने बचाव पक्षाने मांडलेले मुद्दे ग्राह्य धरत महिला डॉक्टरला जामिन मंजूर करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाचा हा आदेश प्रकरणाच्या पुढील कार्यवाहीस महत्त्वपूर्ण दिशा देणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वेरीची एआयसीटीईच्या 'परम शवक' या उपक्रमासाठी निवड!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!