बुद्धगया येथे टेम्पल कायदा अस्तित्वात असल्याने सदरचा कायदा रद्द करून मंदिर व्यवस्थापनासाठी फक्त बौद्ध धर्मीयांची नियुक्ती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन..!

 बुध्दगया येथे भगवान बुध्दांना ज्ञानप्राप्ती आली. ज्ञानच जगात श्रेष्ठ आहे. डॉ. बाबासाहेब आबेडकर ज्ञानाचीच प्राप्ती केली म्हणून त्याना संविधान लिहिण्याचा अधिकार मिळाला. सध्या बुद्धगया येथे टेम्पल कायदा अस्तित्वात असून सदरचा कायदा रद्द करून त्या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी फक्त बौद्ध धर्मियांची नियुक्ती करण्यात यावी व सदरचे महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावी अशी आमची मागणी आहे. सदरची मागणी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून हे निवेदन रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष सागर गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.




या संदर्भात दि. ०५/०४/२०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भायखळा राणीबाग येथून मंत्रालयापर्यंत आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे. तरी सदर निवेदनाचा बारकाईने विचार करून भारत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब यांना सदर निवेदनाची दखल घेण्यासाठीही निवेदन दिले गेले..!

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!

स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूह २.०’ संपन्न!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!