Posts

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाचा कॅप राऊंड-३ सोमवारपासून सुरु..!

Image
पंढरपूर!  'शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाची तिसरी फेरी (थर्ड कॅप राऊंड) सोमवार, दि. २७ जुलै २०२६ पासून सुरु होणार असून ती प्रक्रिया मंगळवार, दि.२८ जुलै २०२६ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत स्वेरी डिप्लोमाच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. क्रमांक ६४३७) मध्ये कॅप राउंड साठी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. या प्रवेशाची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरूवार दि.३० जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.' अशी माहीती स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक) चे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी दिली.          सन २०२६-२७ च्या पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज निश्चित करणे आदी प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर आता सोमवार, दि. २७ जुलै २०२६ पासून तृतीय प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे सुरु होणार असून ती प्रक्रिया मंगळवार, दि.२८ जुलै २०२६ सायंकाळी ५:०० वाजेप...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा समारोप!

Image
पंढरपूर! आषाढी एकादशी निमित्  ग्रामविकास आणि पंचायतराज विभागातर्फे आयोजित ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रसारख्या पुरोगामी आणि भक्ती मार्गाची समृद्ध परंपरा असलेल्या या राज्यात वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने सन २०१६ पासून सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदा निर्मल वारी उपक्रम सुरु केला आणि सन २०१७ पासून राज्याच्या अर्थसंकल्पात आणून जिल्हा प्रशासन आणि सहयोग संस्था माध्यमातून वारी निर्मल वारी करण्याच्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात शौचालय, स्नानगृह, स्वच्छता आदी व्यवस्था सुविधा सुरु केल्या. वारकऱ्यामध्ये विठू माऊली असल्याने त्याची सेवा करणे हे आपले परम कर्तव्य मानून या भावनेतून या व्यवस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज य...

आषाढी यात्रा 2026 निमित्त पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना व भाविकांना पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने नम्र आवाहन..!

Image
आषाढी यात्रा 2026 निमित्त पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना व भाविकांना पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने नम्र आवाहन! पंढरपूर भुवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक, भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे. शहराचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वाचे आद्य कर्तव्य आहे. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखणे करीता खालील सुचनांचे सर्वांनी पालन करुन पंढरपूर नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे ही नम्र विनंती. 1) राहण्याची व्यवस्था :- यात्रेकरु, दिंडीकरी,फडकरी, भाविकभक्त इ. यांची राहणेची सोय भक्ती सागर 65 एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे. कोणत्याही धोकादायक इमारती मध्ये राहु नये. 2) उघड्यावरील अन्न टाळा :- आपले आरोग्य बिघडू नये म्हणून उघड्यावरील व माश्या बसलेले अन्नपदार्थ, शिळे अन्न आणि नासकी फळे, कापलेली फळे खाणे टाळावे. 3) शुद्ध पाणी :- नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या शुद्ध व पिण्याच्या पाण्याचाच वापर करावा नदीचे व बोअरचे पाणी पिऊ नये. 4) घनकचरा व्यवस्थापन :- आपल्या मठ/संस्था, वास्तव करणाऱ्या ठिकाणी इ. मध्ये निर्माण होणारा कचरा/पत्रावळी द्रोण, शिळे खरकटे अन्न इ. ओला, सुका असा वेग...

गोपाळपूर येथे स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान उत्साहात!

Image
पंढरपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार तसेच स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) विभागामार्फत दि. २२ जुलै २०२६ रोजी गोपाळपूर येथे 'स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी' या स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.      कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर गोपाळपूर येथून रीद्धी-सिद्धी गणेश मंदिरापर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये सुमारे १.५ ते २ टन कचरा संकलित करण्यात आला असून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या कार्यक्रमास गोपाळपूरचे ज्येष्ठ नागरिक दिलीप गुरव, पांडुरंग देवमारे, प्रशासक ग्रामपंचायत साईनाथ अडगटाळे, महसूल अधिकारी, विलास मस्के, उदय पवार, अरुण बनसोडे, राजेंद्र बनसोडे, सचिन आसबे, अतुल गुरव, लक्ष्मण लेंगरे, विक्रम आसबे, राहुल माने, गोपाळ ...

पंढरपूर! आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी 24 ते 26 जुलै दरम्यान महाआरोग्य शिबिर!

Image
पंढरपूर! दिनांक 23 आषाढीवारी 2026 च्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 26 जुलै 2026 या कालावधीत पंढरपूर येथील तीनरस्ता परिसरात महाआरोग्य  शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  या महाआरोग्य शिबिरात वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी,उपचार,औषधोपचार,आरोग्यसल्ला तसेच विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.तसेच गंभीर रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्स सेवा सज्ज ठेवण्यात आली असून तातडीच्या उपचारांसाठी विशेष वैद्यकीय पदके ही कार्यरत असणार आहेत.  याशिवाय आरोग्य संपन्नवारी मोबाईल ॲपद्वारे जवळच्या आरोग्य सुविधांची माहिती रुग्णवाहिका सेवा आरोग्य केंद्रांचे तपशील आणि आपत्कालीन संपर्क उपलब्ध होणार आहेत. शिबिरात आरोग्य शिक्षण प्रतिबंधात्मक उपाययोजना चरणसेवा तसेच आपत्कालीन वैद्यकीय मदत यांचाही समावेश आहे. वारीदरम्यान प्रत्येक वारकऱ्याला वेळेत आणि गुणवत्ता पूर्ण आरोग्यसेवा मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून वारकरी भाविकांनी या मोफत महाआरोग्य...

स्वेरीच्या क्षितीजा उराडे यांची ‘टेक्नीमोंट प्रा.लि.’ या कंपनीत निवड..वार्षिक पॅकेज रु.७ लाखांचे

Image
     ‘टेक्नीमोंट प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात अंतिम वर्षात शिक्षण असलेल्या क्षितीजा हिरामण उराडे यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून  यंदा देखील विक्रमी प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांचा स्वेरीकडे अधिक कल दिसत आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे  प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.             ‘टेक्नीमोंट प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागामधील अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या क्षितीजा हिरामण उराडे यांची निवड केली. उराडे यांना वार्षिक रु. ७ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमधून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्...

स्वेरीच्या निखील जाधव यांची ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रा.लि.’ या कंपनीत निवड.!

Image
 नोकरीच्या तब्बल ४७३ पेक्षा जास्त संधी  पंढरपूरः ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’  या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे निखील नवनाथ जाधव यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून यंदा देखील चांगल्या प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांचा स्वेरीकडे अधिक कल दिसत आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे  प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागामधील अंतिम वर्षात शिक्षण घेणारे निखील नवनाथ जाधव यांची निवड केली असून त्यांना वार्षिक रु. ४ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमधून प्लेसमेंटच्या माध्...