भूमी अभिलेख कार्यालयाच्या खात्यातील अधिकाऱ्यांची लाचेचे दरपत्रक जाहीर करणेबाबत महसूलमंत्र्यांना लिहिले पत्र..

 आदरणीय नाम. चंद्रशेखर बावनकुळे.

महसूल मंत्री,महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई.

                             यांना सविनय सादर...

विषय :- भूमी अभिलेख कार्यालयातील शासकीय कामकाजा करण्यासाठी आपल्या खात्यामधील अधिकाऱ्यांचे लाचेचे दर पत्रक जाहीर करणे बाबत...



महोदय,

        मी अमरजीत राजाराम पाटील.राहणार,पंढरपूर नम्र निवेदन करतो की,माझी शेत जमीन मौजे येवती,तालुका मोहोळ या गावी आहे.मी माझ्या जमिनीच्या हद्दी खुणा निश्चिती करण्यासाठी *दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी द्रुतगती रक्कम रुपये २४,०००/- ऑनलाईन पद्धतीने भरलेले आहेत.* आज आपल्या अधिकाराखाली येणाऱ्या भूमिअभिलेख कार्यालयातील कामकाज बाबत आपण राज्याच्या विधिमंडळात जमीन मोजणी संदर्भात नवनवीन घोषणा करीत आहात.परंतु,आपल्या या तथाकथित लोककल्याणकारी योजनांना हरताळ फासण्याचे काम भूमिअभिलेख कार्यालयातील कामकाज करण्याची पद्धत पाहिल्यावर केले जात असल्याचे दिसून येत आहे.

आपल्या अधिकारात येत असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयात कायद्याने भरावी लागणारी शासकीय रक्कम भरल्या नंतर ही लाच दिल्या शिवाय कोणतेही काम करण्यास अधिकारी वर्ग हालचाल करीत नाही.असा सर्व सामान्य नागरिक,शेतकऱ्यांचा रोजचा अनुभव आहे.हे उघड गुपित आहे.

माझ्या स्वतःच्या येवती,ता.मोहोळ येथील गट क्रमांक ५० च्या हद्दी खुणा निश्चिती करण्यासाठी द्रुतगती रक्कम भरून ६ महिने झाले तरी आज पर्यंत सदर हद्दी खुणाची निश्चिती केली गेलेली नाही.परंतु,आमच्या नंतर जमीन मोजणी साठी अर्ज केलेल्या अनेक लोकांच्या मोजणी करण्यात आलेल्या आहेत.असा आमच्या गावातील अनेक लोकांचा अनुभव आहे.* थोडक्यात काय तर,आपल्या अधिकारातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी लाच घेतल्या शिवाय आम्ही कोणतेही काम करणारच नाही.अशी प्रतिज्ञाच घेतलेली दिसत आहे.

तरी आपल्या अधिकारात येणाऱ्या सदर मोहोळ उप विभागीय भूमी अभिलेख कार्यालयातील व किंबहुना राज्यातील सर्वच महसुली कार्यालयातील लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी लाच घेण्याचे अधिकृत दरपत्रक जाहीर करून लाच घेणे हा शासकीय कामकाज करण्यासाठी कर्तव्याचा भाग असल्याचा कायदा करण्यात यावा.अशा प्रकारचा कुठलाही कायदा सध्या अस्तिवात नसल्यामुळे मला माझ्या जमीन हद्दी खुणा निश्चिती करण्यासाठी नेमकी किती रक्कमेची लाच दिली पाहिजे ? याची माहिती नसल्यामुळे मी आपल्या नावे कोरा चेक पाठवत आहे.तरी आपण मोहोळ उप विभागीय भूमी अभिलेख कार्यालायातील जे कामचुकार अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांना विचारून सदर चेक वर त्यांच्या लाचेची रक्कम भरून माझ्या जमिनीच्या हद्दी खुणा निश्चिती करण्याचे काम करून द्यावे.ही नम्र विनंती.*

                                                                   आपला

                                                          अमरजित राजाराम पाटील.

                                                       चेअरमन,दि.पंढरपूर मर्चंट

                                                           को-ओप बँक,पंढरपूर

        

माहितीसाठी प्रत सादर

१) मा.जिल्हाधिकारी,सोलापूर जिल्हा,सोलापूर.

२) मा.सर्व पत्रकार

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!

स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूह २.०’ संपन्न!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!