2025 आषाढी यात्रेच्या निमित्ताने वारकरी भाविकांना पंढरपूर नगर परिषदेकडून नम्र आवाहन

 झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग.. 



पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांच्या वतीने आषाढी यात्रा 2025.. स्वच्छ भारत अभियान.. स्वच्छ महाराष्ट्र अभियान..स्वच्छ संरक्षण 2025..माजी वसुंधरा यांच्या वतीने यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन करण्यात आले, पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी असून या नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे स्वागत करत चंद्रभागा नदीचे व पंढरपूर नगरीचे पवित्र व स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य समजून व सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी सर्व सूचनांचे पालन करत सहकार्य करण्याची देखील विनंती पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे व प्रांत अधिकारी सचिन इथापे यांच्यावतीने करण्यात आले.. 

यात्रेकरू दिंडीकरी व फडकरी तसेच भाविक भक्तांना भक्ती सागर म्हणजे 65 एकर या परिसरात राहण्याची सोय केलेले आहे... उघड्यावर शौचास बसू नये व प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणीच शौचालयाचा वापर करावा... जेवणासाठी थर्माकोल प्लास्टिक पत्रावळी वापरू नये तसेच कॅरीबॅगचाही वापर टाळावा व पर्यावरणाचा समतोल साधावा...आपला मठ व संस्थेमध्ये ओला सुका कचरा वेगवेगळा साठवून ठेवून ती नगरपालिकेची घंटा गाडी आल्यावरच टाकावा... 

बोअरचे व नदीचे पाणी पिऊ नये यासाठी नगर परिषदेच्या नळाचा किंवा पिण्याच्या पाण्याचा टँकरचे पाणी प्यावे.. शिळे व नास्की फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये... धोकादायक इमारतीमध्ये राहू नये... तसेच नियोजित पार्किंगच्या ठिकाणी आपली पार्किंग व्यवस्था करण्यात यावी.



Comments

Popular posts from this blog

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!

स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूह २.०’ संपन्न!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!