पी.एम.किसान योजना व आष्टी उपसा सिंचनमधील नुकसान भरपाई मिळणेबाबत मनसे शेतकरीसेनेचे जिल्हाध्यक्षकडून कृषीमंत्र्यांना निवेदन..!

 मागील दोन चार पाच दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे रविवारी एका दिवसात राज्यात सरासरी 120 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे मान्सूनपूर्व पावसाचा पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्यांना अधिक फटका बसला आहे या पावसामध्ये नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी व महसूल विभागाला दिले आहेत पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल अशी घोषणा खुद्द कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज दिले.



त्या अनुषंगाने आज यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे यांनी जाधववाडी मोडनिंब या गावातील आष्टी उपसा सिंचन योजनेमधील फळबागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळाली नसल्याच्या कारणाने तसेच 59 19 82 व्हिलेज कोड हा सातबारा उतारा आणि पीएम किसन पोर्टलवर उलट व्हिलेज दाखवत नसल्याने पी.एम.किसान योजनेला अडचणी निर्माण होत असल्याच्या कारणाने व्हिलेज कोड दुरुस्त करून देण्याबाबत पत्र देण्यात आले.

त्याचवेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ज्या लोकांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही, यावर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत आदेश देण्यात आले.

यावेळी मनसे विद्यार्थीसेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राहुल सुर्वे, व इतर पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वेरीची एआयसीटीईच्या 'परम शवक' या उपक्रमासाठी निवड!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!